महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साताऱ्यात डॉक्टरांची डान्स बारवर मैहफिल! पाचगणी येथील रिसोर्टवर पोलिसांचा छापा; चार युवती, आठ डॉक्टरांसह हॉटेल चालक ताब्यात

12:38 PM Dec 13, 2023 IST | Abhijeet Khandekar
Satara Police raid resort in Pachagani
Advertisement

सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर मिरज मधील एक असे एकूण आठ जणांचा विरोधात गुन्हा दाखल

कुडाळ प्रतिनिधी

कासवंड येथील स्प्रिंग रिसोर्टवर 'छमछम' सुरू असतानाच पोलिसांचा छापा; चार युवती, सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज मधील एक व पुण्याचा फार्मासिस्ट असे एकूण आठ जण ताब्‍यात घेतले आहेत. या घटनेमुळे सातारा जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे डॉ. मनोज विलास सावंत रा. दहिवडी, डॉ. राहुल बबनराव वाघमोडे रा. दहिवडी, डॉ. निलेश नारायण सन्मुख रा. मिरज, डॉ. रणजीत तात्यासो काळे रा. दहिवडी, डॉ. महेश बाजीराव साळुंखे मलकापूर कराड, डॉ. खाडे सातारा, डॉ. प्रवीण शांताराम सौद रा. पुणे फार्मासिस्ट.

Advertisement

थंड हवेचे ठिकाण पाचगणी कासवंड गावातीलच स्प्रिंग रिसॉर्ट नावाच्या ठिकाणी हॉटेलमधील एका हॉलमध्‍ये चार सांगली पुण्यातून नर्तिका आणण्‍यात आल्‍या असून, त्‍या गिऱ्हाईकांसमोर तोकड्या कपड्यात बीभत्स हावभाव, अंगविक्षेप करत नाचत असल्‍याची माहिती साताऱ्याच्या ॲडिशनल एसपी आचल दलाल यांना मिळाली. त्यावरून साताऱ्यावरून विशेष पथक पाचगणी कासवंड येथे रवाना करण्यात आली.

Advertisement

घटनास्थळावर पोहोचताच रात्री साडेनऊच्या सुमारास पाचगणी कासवंड येथील स्प्रिंग रिसॉर्ट च्या तळमजल्यात सातारा जिल्ह्यातील पाच डॉक्टर व मिरज असे सहा ते सात जण दारूच्या नशेत नर्तिकांच्या समोर झिंगत असतानाच रंगेहात पोलिसांना सापडले.
छापा टाकला त्‍यावेळी नर्तिका नाचत असल्‍याचे असल्‍याचे दिसून आले. पोलिसांनी कारवाई करत चार महिला त्‍यांच्‍यासमवेत नाचणाऱ्या सहा डॉक्टर व एक फार्मासिस्ट रिसॉर्ट चालक शिर्के नावाच्या व्यक्ती असे एकूण आठ जणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे पाचगणी पोलीस पोलिस ठाण्‍यात गुन्‍हा नोंदविण्‍याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Advertisement
Tags :
Doctor concertresort in PachaganiSatara Policetarun bharat news
Next Article