...ते काय बोळ्याने दूध पितात काय?
सातारा :
आपण आताच्या ज्या स्वराज्यात सर्वजण राहतो. जी स्वराज्याची संकल्पना ज्यांनी अस्तित्वात आणली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण आणली. मी तर देव पाहिला नाही परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपाने त्यावेळी लोकांनी देव पाहिला. या लोकशाहीत महापुरुष म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना मानले जाते. त्यांच्यामुळे अनेक महापुरुष निर्माण झाले. त्यांच्या संरक्षणासाठी कायदे झाले. परंतु राजमाता जिजाऊ, छत्रपती शहाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी आयुष्य वेचले त्यांच्यासाठी कायदा होवू शकत नाही, अशी खंत व्यक्त करत खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली. तसेच विशेष अधिवेशन बोलवून कायदा नाही केला तर हे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान व्हावा अशी त्यांची अपेक्षा आहे काय? हे काय बोळ्याने दूध पितात काय अशी तोफ खासदार उदयनराजे यांनी सत्ताधाऱ्यांसह विरोधकांवर त्यांनी डागली.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने त्यांनी वढू तुळापूर येथे जावून छ. संभाजी महाराज यांना अभिवादन केले. त्यावेळी ते पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. या लोकशाहीत छत्रपती शिवाजी महाराज हेच महापुरूष आहेत. दुर्देव आपले हे की मूळ पुरुषांची म्हणजेच छ. शहाजीराजे, छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांची वारंवार थट्टा, अवहेलना, गलिच्छ टिकाटिप्पणी होताना दिसते. ज्यांनी स्वत:चे आयुष्य लोकांसाठी वेचले. रयतेसाठी घालवलं. त्याच रयतेतील काही लोक, त्याच समाजातील काही लोक युगपुरुषांचे अवमान करतात. हे किती काळ आपण सहन करुन घेणार. छत्रपती शिवाजींच्यामुळे अनेक महापुरुष घडले. त्यांचे सरंक्षण करण्यासाठी कायदे निर्माण झाले. पण छ. शिवाजी महाराज, छ. संभाजी महाराज यांचे संरक्षण करण्यासाठी कायदे बनवायला बजेटची आवश्यकता नसते. मकोका, अॅट्रोसिटीसारखा कायदा केला तर जो कोणी चुकीचे अवमानजनक वक्तव्य करेल त्याला नॉन बेलेबल किमान दहा वर्ष शिक्षा लागू झाली पाहिजे, असा कायदा पारित झाला पाहिजे. त्याकरता सर्व पक्षांच्या नेत्यांना सांगून झाले. प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातून म्हणतात की, छ. शिवाजी महाराजांना दैवत मानतो तर त्यांनी या अधिवेशानच्या अगोदर कायदा केला केला असता. अजूनही वेळ गेली नाही. त्यांचा अवमान व्हावा असे लोकप्रतिनिधींना वाटते काय. कायदा झाल्यानंतर साधारण साठ दिवसाच्या आत लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालेल, असे प्रखरपणे त्यांनी आपले मत मांडले.
- अरबी समुद्राऐवजी मुंबईत भव्य स्मारक व्हावे
पत्रकारांनी अरबी समुद्रातील स्मारकाबाबत छेडले असता खासदार उदयनराज्sा म्हणाले, अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक बनवणार अशी घोषणा नुसती केली नाही तर त्याचे भूमिपूजन झाले होते. तेथे समुद्रात स्मारक बनवता येत नसेल तर मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक बनवा. का होवू नये, झालेच पाहिजे. राज्यातील राजगड असेल, रायगड असेल, सातारा असेल असे संपूर्ण किल्ले आहे. त्यांचे एक स्वराज्य सर्कीट स्थापन झाले पाहिजे. छ. शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे संवर्धन झाले पाहिजे.
- पशा, राहुल्या होणार नाहीत
हा कायदा जर बनवला तर पशा, राहुल्या असे क्रियानिष्ट होणार नाहीत. त्यांना समाजात काही किंमत नाही. असे लोक पुन्हा धाडस करतील का, असा सवाल उपस्थित करत, वाघ्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, वाघ्या कोण वाघ्या, एकच वाघ होवून गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. सध्या अनेकजण आपली विद्वता प्रदर्शन करत आहेत. धनगर समाज आणि होळकर यांचा संबंध जोडून तेढ निर्माण करु पहात आहेत. वाघ्याचा सबंध काय, का आलं स्मारक, कधी आले. त्याची इतिहासात नोंद नाही, आहे काय, अशा शब्दात त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करत वेशेष अधिवेशन का आतापर्यंत बोलवले नाही तर यांना शिवाजी महाराजांचा अवमान व्हावा असे वाटते आहे. वारंवार मी किती सांगायचे. त्यांना कळायला पाहिजे ना. ते काय बोळ्याने दूध पितात का, दिसत नाही का त्यांना. दंगली होतात, माणसे मरतात, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वांच्यावर उदयनराजेंनी सडकून टीका केली. पुढे त्यांनी अमित शाह यांच्याकडे मागणी केली असल्याचे सांगितले.
मी मागेपण औरगंजेबाच्या कबरीबाबत बोललो आहे. तो हलकट होता. त्याचे कोण स्टेट्स ठेवत असेल तर त्याने देशाच्या बाहेर जावे, असेही खासदार उदयनराजेंनी स्पष्टपणे बजावले.