महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जी भूमिका शोभते तीच करावी : अभिनेत्री राणी मुखर्जी

11:56 AM Nov 27, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : मी आतापर्यंत पात्राचा विचार न करता भूमिकेला न्याय दिला. आपली देहबोली यात महत्त्वाची भूमिका निभावते. त्यामुळे आपण वेगळे असणे महत्त्वाचे आहे. आपली सिनेसृष्टी ही प्रसिद्ध सिनेसृष्टी आहे. त्यामुळे आपले वय आणि आपल्या वयानुसार जी भूमिका तुम्हाला शोभते तीच करावी. स्वत:बद्दलची वास्तविकता स्वीकारा, असे मत प्रसिद्ध अभिनेत्री राणी मुखर्जी यांनी 54 व्या इफ्फीमध्ये आयोजित केलेल्या मास्टरक्लासमध्ये बोलताना व्यक्त केले. भूमिकेसाठी वयस्क दिसण्यासाठी तसेच युवा दिसण्याकरितासुद्धा कलाकार भरपूर मेहनत घेतात. कलाकारापुढे खरं आव्हान तर वयस्क दिसण्यात असते. त्यामुळे तुम्ही जे काही आहात, जसे आहात ते स्वीकारा आणि निरोगी जीवनशैली  अवलंबून प्रेक्षकांसाठी चांगले दिसा, असे त्या म्हणाल्या. कुछ कुछ होता है चित्रपटानंतर आपण आईची भूमिका करायला सुरूवात केली. आपणास पूर्वीपासूनच भारतीय महिलेची भूमिका साकारण्याची इच्छा होती. कारण भारतीय स्त्राrमध्ये सर्व भाव दिसून येतात आणि तेच भाव भूमिकेतून आणण्याचा प्रयत्न केला.

Advertisement

भारतीय चित्रपट हे संस्कृतीचे माध्यम

Advertisement

आपले भारतीय चित्रपट हे जागतिक पातळीवरही पाहिले जातात. त्यामुळे आपली भारतीय स्त्राr किंवा भारतीय संस्कृती काय आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न करत असते. कारण आपल्या चित्रपटांना भारतीय संस्कृतीचे एक माध्यम म्हणून समजले जाते.

प्रत्येक पात्र हे सशक्त स्त्राrकडून प्रेरित

सशक्त चित्रपट आणि भूमिकांच्या पाठीशी नेहमी उभे राहणे महत्त्वाचे आहे. कधीकधी तुम्हाला त्या कालावधीत प्रेक्षकांची मान्यता मिळू शकत नाही. पण चित्रपटसृष्टीच्या इतिहासात अशा चित्रपटांना आणि पात्रांना स्थान मिळेल. माझ्या प्रत्येक चित्रपटातील पात्र किंवा भूमिका ही सशक्त स्त्राrकडून प्रेरित आहे. कारण प्रेरित असलेल्या भूमिकेतील भावना या नैसर्गिकरित्या मांडता येतात. जेव्हा कधी अशाप्रकारच्या भूमिका येतात ती मी आपोआपच आकर्षित होते. कलाकारामध्ये बहुमुखीपणा किंवा अष्टपैलूत्व असणे आवश्यक आहे. कारण ते जीवनाचे विविध पैलू चित्रित करू शकतात. मी माझी पात्रे जितकी वैविध्यपूर्ण बनवू शकेन तितकेच ते माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी अधिक मनोरंजक असेल. पात्रांमधील विविधताही मला प्रेरणा देते. असे राणी यांनी यावेळी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article