महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळगाव-सौंदत्ती रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करा

11:22 AM Aug 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खासदारांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी : यल्लम्मा देवस्थानला कनेक्टिव्हिटीची गरज

Advertisement

बेळगाव : सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात. केवळ कर्नाटकच नाही तर महाराष्ट्र, गोवा, आंध्रप्रदेश आदी राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक देवीचे दर्शन घेतात. देशातील एक महत्त्वाचे देवस्थान असताना अद्याप येथे रेल्वे कनेक्टिव्हिटी नाही. त्यामुळे बेळगाव-सौंदत्ती रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण करण्याची मागणी बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली. बुधवारी खासदार शेट्टर यांनी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन बेळगाव व परिसरातील रेल्वे प्रकल्पांबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांच्यासोबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा देखील उपस्थित होते.

Advertisement

यल्लम्मा देवस्थानला ये-जा करण्यासाठी रेल्वे उपलब्ध झाल्यास भाविकांची संख्या आणखी वाढणार आहे. यामुळे भाविकांनाही ये-जा करणे सोयीचे होईल. सध्या सौंदत्ती येथे ये-जा करण्यासाठी अनेक महामार्ग असले तरी वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या ऐवजी रेल्वेमार्ग झाल्यास प्रवाशांना देवस्थानला ये-जा करण्यास सुखकर होईल. त्यामुळे बेळगाव-सौंदत्तीसाठी नवीन रेल्वेमार्ग करण्याची मागणी खासदारांनी केली. रेल्वेमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नैर्त्रुत्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांना सर्वेक्षण करण्यासाठी निर्देश देऊ, असे आश्वासन दिले. याबरोबरच 2016 मध्ये हुबळी येथे काही शेतकऱ्यांनी रेल्वे वाहतूक रोखली होती. या शेतकऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी शेट्टर यांनी केली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article