कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पूरस्थिती हाताळण्यास सुक्ष्म नियोजन करा

03:13 PM May 21, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर :

Advertisement

मान्सून कालावधीत इचलकरंजी, हातकणंगले भागात पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करा. तसेच त्यानुसार कार्यवाही करा, अशा सूचना जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.

Advertisement

वारणा आणि पंचगंगा नदी काठावरील निलेवाडी, जुने पारगाव, किणी, घुणकी, भादुले, वाठार, खोची, चावरे, पट्टणकोडोली, रुई, इंगळी, चंदूर, रांगोळी, इचलकरंजी आदी संभाव्य पूरबाधित भागांबाबत तालुका प्रशासनाने आणि इचलकरंजी महापालिकेने केलेल्या तयारीचा जिल्हाधिकारी येडगे यांनी मंगळवारी आढावा घेतला. तसेच हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी, जुने पारगाव येथील ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. तसेच वारणा उद्योग समूह येथील पूरबाधित नागरिकांसाठीच्या संभाव्य निवारा केंद्राची पाहणी केली.

जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, हातकणंगले, इचलकरंजी भागात पुराने वेढा पडणाऱ्या गावांची नावे आणि या गावांमध्ये द्याव्या लागणाऱ्या सोयीसुविधांची माहिती तयार ठेवा. मान्सून कालावधीत अतिवृष्टी झाल्यास नदीच्या वाढणाऱ्या पाणी पातळीचा अंदाज घेऊन नागरिकांचे वेळेत सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा. धरणांमधून पाण्याचा विसर्ग होण्यापूर्वी नदीकाठच्या नागरिकांना सतर्क करा. पुराच्या पाण्यात नागरिक अडकणार नाहीत, याची खबरदारी घ्या. पाणीपुरवठा आणि वीज पुरवठा खंडित झाल्यास त्वरित पूर्ववत करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ, साधनसामग्री तयार ठेवा.

आपत्कालीन विभागाने सर्व साधनसामग्री, स्वयंसेवकांची पथके तसेच नागरिकांना पूरस्थितीतून बाहेर काढण्यासाठी प्रशिक्षित बचाव पथके सज्ज ठेवावीत. मान्सून काळात रस्ते, पूल पाण्याखाली जातात, अशावेळी नागरिकांकडून पूल ओलांडताना दुर्घटना घडू नये, यासाठी पुराचे पाणी आलेले रस्ते बॅरिकेड्स लावून बंद करा. या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले यांनी तालुका आणि गावनिहाय केलेल्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनाची माहिती दिली. इचलकरंजी आयुक्त पल्लवी पाटील, पोलीस उपअधीक्षक समीरकुमार साळवे, तहसीलदार सुशीलकुमार बेल्हेकर, अपर तहसीलदार सुनील शेरखाने, सार्वजनिक बांधकामचे रोहित तोंदले, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

रस्ते आणि पुलावर पाणी आल्यास त्यातून नागरिकांनी पुराच्या पाण्यात जाऊ नये यासाठी विशेष दक्षता घेतली जावी. तसेच या मार्गावरून वाहन चालवू नये, असे आवाहन करावे. रस्ते व पुलावरील पुराच्या पाण्यात नागरिक गेल्यास दुर्घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करा, अशा सूचना जिल्हाधिकारी येडगे यांनी दिल्या.

पूरपरिस्थितीमुळे पाण्याचा वेढा पडण्याची शक्यता असणाऱ्या गावांना मदतकार्य जलद पोहोचवा. स्थलांतरित होणाऱ्या नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा वेळेत द्या. यासाठी पुरेसे अन्नधान्य व औषधसाठा उपलब्ध ठेवा. पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणत्याही परिस्थितीत जीवित हानी होवू नये. तसेच एकही जनावर वाहून जाऊ नये, यासाठी चोख नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

निवारा केंद्रातील नागरिकांसाठी पिण्याचे पाणी, चहा, नाश्ता, जेवणाची सोय, औषधसाठा तसेच छावणीतील जनावरांसाठी पुरेसे पशुखाद्य, ओला व सुका चारा, औषधसाठा तयार ठेवा. पूर परिस्थिती उद्भवल्यास आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी चोख नियोजन करा, अशा सूचनाही जिल्हाधिकारी येडगे यांनी केल्या.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article