महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कॅन्टोन्मेंट परिसराचा दोन दिवसांत कच्चा सर्व्हे करा

11:01 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अडचणी दूर करून कामाला लागा; मनपा आयुक्तांची सूचना

Advertisement

बेळगाव : कॅन्टोन्मेंटमधील जागा व घरांचा कच्चा सर्व्हे तातडीने करा, दोन दिवसांत त्याचा संपूर्ण अहवाल तयार करून तो उपलब्ध करण्याची सूचना महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी सर्व्हेअरना केली. कॅन्टोन्मेंटच्या काही जागा व मालमत्ता मनपाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. मात्र सर्व्हे झाला नसल्यामुळे समस्या निर्माण झाली असून तातडीने सर्व्हे करावा, असे सांगण्यात आले. गुरुवारी महानगरपालिकेमध्ये महसूल विभागातील कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी महसूल विभागाच्या उपायुक्त रेश्मा तालिकोटी, कौन्सिल सेक्रेटरी महेश जे. उपस्थित होते. या बैठकीला महानगरपालिकेचे महसूल निरीक्षक व नगर नियोजन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना कच्चा सर्व्हे करण्याचा आदेश मनपा आयुक्तांनी दिला आहे. याचबरोबर 2010 पासून शहरामध्ये जे लेआऊट बुडाने केले आहे, त्याचे हस्तांतर झाल्यानंतर पुन्हा सर्व्हे करणे गरजेचे आहे. तेव्हा त्याचाही सर्व्हे करावा, असे अशोक दुडगुंटी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

Advertisement

कॅन्टोन्मेंटमधील काही भाग महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे. त्यामुळे गेले आठ दिवस त्याचा सर्व्हे करण्यात आला तरी काही ठिकाणी सर्व्हे करण्यासाठी नकाशाच उपलब्ध नसल्यामुळे समस्या निर्माण झाली. कॅन्टोन्मेंट आणि महानगरपालिकेतील महसूल विभागाची संयुक्त बैठक घेण्याचे ठरविण्यात आले. मात्र महानगरपालिकेतील महसूल विभागाचीच बैठक घेऊन प्रथम कच्चा सर्व्हे करून घेण्याची सूचना करण्यात आली आहे. शहरामध्ये अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या जागा आहेत. मात्र त्या जागांमध्ये काही जणांनी अतिक्रमण केले आहे. तसेच महानगरपालिकेच्या जागांवरच इमारती उभारल्याचे आढळले आहे. त्याविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी पाऊल उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. तेव्हा प्रत्येक महसूल निरीक्षकाने आपल्या प्रभागातील महानगरपालिकेच्या जागांबाबत संपूर्ण माहिती जमा करावी. ज्यांनी अतिक्रमण केले आहे, त्यांच्या विरोधात संपूर्ण माहिती महानगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन कारवाईसाठी पाऊल उचला, असे आयुक्तांनी सांगितले. महसूल उपायुक्त रेश्मा तालिकोटी यांनी यापूर्वी केलेल्या अहवालाबाबतची माहिती दिली. महसूल निरीक्षकांना त्यांनीही यावेळी सूचना केल्या आहेत. दोन दिवसांत संपूर्ण माहिती देण्याची सक्त ताकीद महसूल निरीक्षकांना केली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article