अनगोळ येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी पारायण सोहळा
बेळगाव : अनगोळ नाथ पै नगर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर येथे रविवार दि. 2 फेब्रुवारी ते गुरुवार दि. 6 फेब्रुवारीपर्यंत श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षीपासून श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हा पाच दिवसांचा आयोजिला आहे. शनिवार दि. 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता श्री ज्ञानेश्वर माउली मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. रविवारी सकाळी 7 वा. श्री ज्ञानेश्वर पारायण संकल्प, श्री गणेश पूजन, श्री विठ्ठल-रुक्मिणी पूजन, श्री मारुती पूजन, श्री माउली अभिषेक, पोथी स्थापना, श्री गुरु वास्कर महाराज फोटो पूजन, विणा, टाळ-मृदंग, पताका, तुळस पूजन करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते 11:30 श्री ज्ञानेश्वरी पारायण, 12 ते 1:30 गाथा भजन, सायंकाळी 5:30 ते 6:30 वा. प्रवचन हभप मारुती रामा नाळकर, 6:30 ते 7 जय जय रामकृष्णहरी सामुदायिक नामजप, सोमवार ते गुरुवार सकाळी 5 ते 6:30 वा. काकड आरती, नित्यपूजा, अभिषेक तर सकाळी 7 ते 11.30 वा. श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी 12 ते 1:30 वा. गाथा भजन होणार आहे.
प्रवचन व नामजप
रविवारी सायंकाळी 5:30 ते 6:30 ह.भ.प. श्री मारूती रामा नाळकर यांचे प्रवचन, सोमवारी सायंकाळी ह.भ.प. श्री सुनील लोहार, अनगोळ यांचे प्रवचन, मंगळवारी सायंकाळी ह.भ.प श्री सदानंद तुकाराम पाटील, किरहलशी यांचे प्रवचन, बुधवारी सायंकाळी ह.भ.प. श्री चंद्रकांत निवृत्ती बेळगावकर यांचे प्रवचन, गुरुवारी सायंकाळी ह.भ.प. श्री कृष्णमूर्ती सुखदेवाप्पा बोंगाळे, हलकर्णी-खानापूर यांचे प्रवचन व नामजप, दररोज सायंकाळी 6:30 ते 7 वाजता जय जय रामकृष्णहरी सामुदायिक नामजप होणार आहे.
कीर्तन सोहळा
रविवारी रात्री 8 ते 10 ह.भ.प. श्री चिंतामणी घोडके पांढरेवाडी पंढरपूर यांचे सांप्रदायिक कीर्तन, सोमवारी रात्री ह.भ.प. श्री दिगंबर यादव, कोल्हापूर, मंगळवारी रात्री ह.भ.प. श्री चैतन्य सदगुरु चैतन्य महाराज वासकर, पंढरपूर, बुधवारी रात्री ह.भ.प. श्री एकनाथ हंडे, पंढरपूर. गुऊवारी सकाळी श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायणाची सांगता. नामजप, ग्रंथपूजन, पसायदान, आरती. दुपारी काला कीर्तन ह.भ.प. श्री कृष्णमूर्ती बोंगाळे, हलकर्णी-खानापूर यांचे होणार आहे. सकाळी 10:30 ते 12:30 श्रींची पालखी मिरवणूक, दिंडी सोहळा, नगर प्रदक्षिणा महामंगळारती व त्यानंतर महाप्रसाद होईल. तरी या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री ज्ञानेश्वरी पारायण मंडळ, अनगोळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.