ज्ञान प्रबोधन मंदिर शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
बेळगाव : आयसीएससी ज्ञान प्रबोधन विद्यालयात आजी-आजोबा दिन, प्राथमिक विभागाचे वार्षिक स्नेहसंमेलन व दहावीच्या विद्यार्थ्यांचा पासिंग आऊट परेड असा संयुक्त कार्यक्रम झाला. प्रमुख पाहुणे म्हणून सल्लागार उदय लवाटे उपस्थित होते. त्यांनी आजी-आजोबांची भूमिका फार महत्त्वाची आहे. आजच्या मोबाईल इंटरनेटच्या काळात पुस्तक वाचण्यावर अधिक भर देणे गरजेचे आहे. त्याबरोबर मुलांसाठी देखील वेळ देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. दुसऱ्या दिवशीच्या स्नेहसंमेलन आणि पासिंग आऊट परेड कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्त्राrरोगतज्ञ डॉ. सतीश धामणकर उपस्थित होते. ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, जीवनात यश मिळविण्यासाठी सतत मेहनत आवश्यक आहे. निराश न राहता नेहमी आशावादी रहावे, असेही त्यांनी सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांचे सामूहिक नृत्य
उत्कृष्ट विद्यार्थी अर्जुन बालिगा याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याबरोबर गतवर्षी दहावीच्या परीक्षेत आणि विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्राचार्या मंजिरी रानडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ देवविली. यावेळी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये उत्तम सामूहिक नृत्य सादर केले. प्रारंभी ईशस्तवन व स्वागतगीत झाले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी शाळेचे ट्रस्टी वसंत सामंत, विवेक कामत, संचालक अनिल चौधरी, नितीन कपिलेश्वरकर, गिरीधर रविशंकर, प्रशासक डॉ. गोविंद वेलिंग, जगदीश कुंटे, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन भूवी भट हिच्यासह इतरांनी केले. आभार इवांका साळवे व तिर्था पाटील यांनी मानले.