ज्ञानप्रबोधन, केएलई, हेरवाडकर विजयी
बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित सराफ शिल्ड क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : बेळगाव स्पोर्ट्स क्लब आयोजित सराफ शिल्ड 15 वर्षांखालील आंतर शालेय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यातून ज्ञानप्रबोधनने अमोघ स्कूल रायबागचा 84 धावाने, वनिता विद्यालयाने नोबेल हायस्कूल संघाचा 176 धावाने, केएलई इंटरनॅशनलने सेंट झेवियर्सचा 44 धावाने तर एम.व्ही.हेरवाडकरने वनिता विद्यालयाचा 122 धावांनी पराभव करुन प्रत्येकी 2 गुण मिळविले. लक्ष्य खतायत, अतित भोगण, समर्थ पांडे, संजल गोरल यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. एसकेई प्लॅटिनम ज्युब्ली मैदानावरती खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात ज्ञानप्रबोधन मंदिरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 7 गडी बाद 158 धावा केल्या. सुजल गोरलने 1 षटकार व 8 चौकारांसह 66, वरुण के.ने 4 चौकारांसह 23 धावा केल्या. रायबागतर्फे प्रणित खोतने 30 धावांत 3, यश जी.ने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना अमोघ स्कूल रायबागचा डाव 19 षटकात 74 धावांत आटोपला. त्यात साकीब अत्तारने 2 चौकारांसह 21 धावा केल्या. ज्ञानप्रबोधनतर्फे अद्वैत भट्टने 5 धावांत 3, सुजल गोरलने 14 धावांत 2 गडी बाद केले. दुसऱ्या सामन्यात वनिता विद्यालयाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात बिनबाद गडी बाद 204 धावा केल्या. त्यात समर्थ पांडेने 11 चौकारांसह नाबाद 60, झोया काझीने 6 चौकारांसह नाबाद 40 धावा केल्या.
या जोडीने पहिल्या गड्यासाठी 204 धावांची अभेद्य भागिदारी केली. प्रत्युत्तरादाखल खेळताना नोबेल स्कूलचा डाव 9.5 षटकात 28 धावांत आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. वनितातर्फे आदी हट्टीकरने 2 धावांत 3, झोया काझीने 3 धावांत 2 गडी बाद केले. तिसऱ्या सामन्यात केएलई इंटरनॅशनलने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी बाद 156 धावा केल्या. त्यात कौस्तुभ पाटीलने 5 चौकारांसह 40, यश शहाने 1 षटकार 4 चौकारांसह 39, अतित भोगणने 3 चौकारांसह 26 तर कलश बेनकट्टीने 21 धावा केल्या. झेवियर्सतर्फे परिक्षीत वांडकरने 28 धावांत 2 तर चेतन आणि अद्वैत यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना झेवियर्स संघाने 20 षटकार 5 गडी बाद 112 धावा केल्या. त्यात परिक्षित वांडकरने 5 चौकारांसह 38, अद्वैत के.ने 23, अनिषने 13,अनिष के.ने 11 धावा केल्या. केएलईतर्फे कलश बेनकट्टी आणि अतित भोगणनने प्रत्येती 2 गडी तर विख्यातने 1 गडी बाद केला. चौथ्या सामन्यात एम. व्ही. हेरवाडकरने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 4 गडी बाद 162 धावा केल्या. त्यात लक्ष्य खतायतने 17 चौकारांसह 92 इतर सुजल इटगीने 20 धावा केल्या. वनितातर्फे झोया काझीने 23 धावांत 2 तर सनमने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना वनिताचा डाव 15.3 षटकात 40 धावांत आटोपला. त्यांचा एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या गाठू शकला नाही. हेरवाडकरतर्फे सिद्धांत एम.ने 1 धावांत 3 तर लक्ष्य खतायतने 8 धावांत 2 गडी बाद केले.