For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दर्शनसह 9 आरोपींची डीएनए चाचणी

06:24 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
दर्शनसह 9 आरोपींची डीएनए चाचणी
Advertisement

रेणुकास्वामी खून प्रकरणी पुरावे जमा करण्याच्या हालचाली

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणी पोलिसांकडून आरोपींविरुद्ध पुरावे जमा केले जात आहेत. या उद्देशाने एक पाऊल पुढे जात पोलिसांनी कन्नड सिनेअभिनेता दर्शन, त्याची प्रेयसी पवित्रा गौडासह 9 आरोपींची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता त्यांना बुधवारी बेंगळूरच्या व्हिक्टोरिया इस्पितळात नेण्यात आले.

Advertisement

रेणुकास्वामीचा खून झालेल्या बेंगळूरच्या पट्टणगेरे येथील शेडमध्ये रक्ताचे नमुने आणि केस सापडले आहेत. फॉरेन्सिक लॅबच्या तज्ञांनी त्यांची तपासणी केली आहे. खून झालेल्या ठिकाणी आढळलेले रक्ताचे नमुने आणि केस कोणाचे आहेत, याची स्पष्ट माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी आरोपींची डीएनए चाचणी करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. इस्पितळात आरोपींच्या रक्ताचे नमुने आणि केस जमा करण्यात आले. हे नमुने शेडमधून जमा करण्यात आलेल्या नमुन्यांशी कितपत जुळते, याविषयी खातरजमा केली जाणार आहे. तांत्रिक आणि डिजिटल पुराव्यांवर अधिक भर दिलेल्या पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज, सीडीआर (कॉल डाटा रेकॉर्ड) व इतर पुराव्यांचाही शोध घेतला जात आहे.

प्रकरणात नाव येऊ नये यासाठी 30 लाख दिल्याची दर्शनची कबुली?

चित्रदुर्गमधील रेणुकास्वामी याच्या खून प्रकरणात आपले नाव लपविण्यासाठी अभिनेता दर्शनने 30 लाख रुपये दिल्याची पोलिसांसमोर स्वेच्छेने कबुली दिल्याचे समजते. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी, खटल्यासाठी वकील आणि रेणुकास्वामीचा मृतदेह वाहनू नेणाऱ्या व्यक्तींसाठी येणारा खर्च देण्याकरिता प्रदोश याला 30 लाख रुपये दिल्याची दर्शनने स्वत:हून कबुली दिल्याचे समजते.

पोलिसांनी चौकशीवेळी दर्शनचा जबाब नोंदविला असून खून झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून प्रकरणात आपले नाव कोठेही येऊ नये, याकरिता 30 लाख रुपये दिले होते. मात्र, पट्टणगेरे येथील शेडमध्ये झालेल्या हल्ल्यावेळी आपण तेथे सहभागी नव्हतो, असा सूर दर्शनचा आहे.

शेडच्या परिसरातील काही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले असता 8 जून रोजी रात्री दर्शन आपल्या जीपमधून शेडकडे निघाल्याचे दिसून आले आहे. खुनानंतर दर्शनने आरोपींसमवेत पार्टी केल्याचेही प्रत्यक्षदर्शींनी साक्ष नोंदविली आहे. मात्र, आरोपींनी पट्टणगेरे येथील शेडमधील कोणतेही सीसीटीव्ही फुटेज शिल्लक ठेवलेले नाहीत.

‘त्या’ दोन मोबाईलचा शोध

आरोपींनी रेणुकास्वामी आणि आरोपी राघवेंद्र यांचे मोबाईल नाल्यामध्ये फेकून देण्यात आले होते. 8 जून रोजी आरोपी प्रदोश याने हे मोबाईल सुमनहळ्ळी येथील नाल्यात फेकून दिले होते. मागील 11 दिवसांपासून त्याचा शोध घेतला जात आहे. या मोबाईलमध्ये रेणुकास्वामी याच्यावरील हल्ल्याच्या घटनेचे चित्रिकरण करण्यात आल्याचे समजते. त्यामुळे हे मोबाईल प्रकरणातील महत्त्वाचे पुरावे आहेत. त्यामुळे ते शोधण्यासाठी अग्नीशमन दलाची मदत मागण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.