For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लोकसभा निवडणुकीसाठी द्रमुकचा वॉररुम

06:34 AM Feb 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
लोकसभा निवडणुकीसाठी द्रमुकचा वॉररुम
Advertisement

तामिळनाडूच्या सर्व जागांवर विजय मिळविण्याचे लक्ष्य

Advertisement

वृत्तसंस्था/ चेन्नई

लोकसभा निवडणुकीपूर्वी द्रमुकने रविवारी तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एक वॉररुम स्थापन करण्याची घोषणा केली आहे. याचे व्यवस्थापन वरिष्ठ नेत्यांकडून केले जाणार आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 39 पैकी 38 जागांवर विजय मिळविणाऱ्या द्रमुकने यावेळी राज्यातील सर्व 39 जागा तसेच पु•gचेरीची एकमात्र जागा जिंकण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे.

Advertisement

नवे लक्ष्य पाहता पक्षाची यंत्रणा कार्यरत राहिली आहे. निवडणूक रणनीतिंमध्ये सुधारणा करणे आणि मतदारांशी पूर्णवेळ संवाद साधण्यासाठी पक्षाने स्वत:चा वॉररुम स्थापन केला आहे.

वरिष्ठ नेते अनबागम कलाई आणि ऑस्टिन हे वॉररुमचे प्रभारी असणार आहेत. कलाई हे पक्षाचे राज्य सह-संघटन सचिव असून ते बूथ समिती आणि मतदारसंघ समन्वयांसोबत संपर्क साधणार आहेत. द्रमुकने प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक समन्वयक नियुक्त केला आहे. हा समन्वयक बूथ समित्यांमध्ये निर्णय घेऊ शकणार आहेत. वॉररुम आता पक्ष सह-संघटन सचिवाच्या केंद्रीकृत नियंत्रणासोबत या बूथ समित्या आणि मतदारसंघ समन्वयकांदरम्यान समन्वय साधणार आहे.

ऑस्टिन हे पक्षाच्या स्टार प्रचारकांसोबत माध्यमविषयक प्रभारी असणार आहेत. पक्ष नेते आणि खासदार एन.आर. एलांगो हे कायदेशीर विषयांसोबत निवडणूक आयोगाशी संबंधित मुद्द्यांच्या समन्वयासाठी जबाबदार असणार आहेत.

अत्याधुनिक सुविधांनी युक्त वॉररुम

पक्ष वॉररुममध्ये हायस्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटीसोबत मागील निवडणुकांचा डाटा आणि आकडेवारीसमवेत सर्व सुविधा असणार आहेत.  बूथ स्तरावर समुदायनिहाय माहिती आणि राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभार्थींची संख्या देखील वॉररुमध्ये माउसच्या एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. द्रमुक बूथला मध्यवर्ती स्थानी मानून सुक्ष्म स्तरीय अभियानाची योजना आखत आहे. पक्षाची विचारसरणी लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर केला जाणार आहे.

वॉररुम पक्षाचे केंद्रीकृत निवडणूक मुख्यालय असेल आणि पक्ष मुख्यालय तसेच जिल्हा स्तरावरील पक्षादरम्यान एक प्रमुख संपर्क केंद्राप्रमाणे कार्य करणार आहे. बूथ स्तरावर पक्ष समित्या वॉररुमसोबत थेट संपर्कात राहणार आहेत अशी माहिती पक्ष महासचिव आणि राज्याचे मंत्री एस. दुरईमुरुगन यांनी दिली आहे.

Advertisement
Tags :

.