कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इटालियन ओपन स्पर्धेतून जोकोविचची माघार

06:23 AM May 01, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ रोम

Advertisement

सर्बियाच्या नोव्हॅक जोकोविचने इटालियन ओपन टेनिस स्पर्धेतून माघार घेतली आहे. गेल्या तीन स्पर्धांत त्याला पहिल्याच फेरीत पराभूत व्हावे लागले होते. त्या पार्श्वभूमीवर त्याने हा निर्णय घेतला आहे. प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत तो पूर्ण क्षमतेने खेळू शकेल का, याबाबतही आता शंका व्यक्त केल्या जाऊ लागल्या आहेत.

Advertisement

पुढील महिन्यात रोममध्ये ही क्ले कोर्ट स्पर्धा होणार असून त्यात जोकोविच खेळणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. या मोसमात जोकोविचला झगडावे लागत असून 12-6 असे त्याचे या मोसमातील रेकॉर्ड आहे. मात्र मियामी ओपन, माँटे कार्लो मास्टर्स, व माद्रिद ओपन या गेल्या तीन स्पर्धांत त्याला प्रारंभीच पराभव स्वीकारावे लागले आहेत. त्याने आतापर्यंत 24 ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या असून 100 वे एटीपी टूर टायटल जिंकण्याच्या मार्गावर तो आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये त्याने कार्लोस अल्कारेझचा पराभव करून सुवर्णपदकही जिंकले आहे. 25 मे पासून पॅरिसमध्ये फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा होणार आहे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article