महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जोकोविच, किनवेन, क्लारा ब्युरेल दुसऱ्या फेरीत

06:59 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

व्हेरेव्ह, टायफो, फ्रिट्ज यांचेही विजय,  स्लोअन स्टिफेन्स, थिएम, कोव्हासेव्हिक, सुमित नागल पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था/वॉशिंग्टन

Advertisement

2024 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू झालेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रॅन्डस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत सर्बियाचा विद्यमान विजेता जोकोविच, अमेरिकेचा फ्रान्सेस टायफो, बेन शेल्टन, जर्मनीचा व्हेरेव्ह तसेच फ्रिट्झ यांनी तर महिला एकेरीत फ्रान्सची ब्युरेल, चीनची ऑलिम्पिक चॅम्पियन झेंग किनवेन यांनी विजयी सलामी दिली. मात्र स्लोअन स्टिफेन्स, अॅनिसिमोव्हा, थिएम, कोव्हासेव्हिक आणि भारताचा सुमित नागल यांचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले.

विद्यमान विजेत्या जोकोविचने पुरूष एकेरीच्या पहिल्या सामन्यात राडू अल्बॉटचा 6-2, 6-2, 6-4 अशा सरळ सेटस्मध्ये दोन तासांच्या कालावधीत पराभव करत विजयी सलामी दिली. आता जोकोविचचा पुढील फेरीतील सामना सर्बियाच्या डिजेरीबरोबर होणार आहे. डिजेरीने पहिल्या फेरीतील सामन्यात जर्मनीच्या स्ट्रफचा पाच सेटस्मधील लढतीत पराभव करत विजयी सलामी दिली. पुरूष एकेरीच्या अन्य एका सामन्यात अमेरिकेच्या टायफोने आपल्या देशाच्या कोव्हासेव्हिकवर 6-4, 6-3, 4-6, 7-5 अशी मात करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. जर्मनीच्या चौथ्या मानांकित अॅलेक्झांडर व्हेरेव्हने आपल्याच देशाच्या मार्टरेरवर 6-2, 6-7 (5-7), 6-3, 6-2 अशी मात करत विजयी सलामी दिली. या सामन्यात व्हेरेव्हने 21 बिनतोड सर्व्हिसची नोंद केली. फ्रान्सच्या मुलेरने ऑस्ट्रेलियाच्या वेल्टनचा 3-6, 7-6 (9-7), 6-3, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. अमेरिकेच्या टेलर फ्रिट्झने अर्जेंटिनाच्या कॅराबेलीचा 7-5, 6-1, 6-2 तसेच इटलीच्या बेरेटेनीने स्पेनच्या व्हिनोलासचा 7-6(7-2), 6-2, 6-3 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. आता पिट्ट्झ आणि बेरेटेनी यांच्यात दुसऱ्या फेरीत लढत होईल. या स्पर्धेतील माजी विजेत्या ऑस्ट्रियाच्या डॉम्निक थिएमचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. अमेरिकेच्या बेन शेल्टनने थिएमचा 6-4, 6-2, 6-2 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

सुमित नागल पराभूत

भारताच्या सुमित नागलचे आव्हान पहिल्या फेरीतच नेदरलॅन्ड्सच्या ग्रिकस्पूरने संपुष्टात आणले. पहिल्या फेरीतील सामन्यात ग्रिकस्पूरने सुमित नागलचा 6-1, 6-3, 7-6 (8-6) असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. हा सामना अडीच तास चालला होता. नागलने ग्रिकस्पूरला विजयासाठी चांगलेच झुंजविले. या स्पर्धेत पुरूष दुहेरीत रोहन बोपन्ना, युकी भांब्री, श्रीराम बालाजी, सुमित नागल हे पुरूष दुहेरीत विविध साथीदारांबरोबर खेळणार आहेत.

क्लाराचा स्टिफेन्सला धक्का

महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात फ्रान्सच्या क्लारा ब्युरेलने स्लोअन स्टिफेन्सचा 0-6, 7-5, 7-5 अशा सेटस्मध्ये पराभव करत विजयी सलामी दिली. स्टिफेन्सने 2017 साली या स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. चीनच्या झेंग किनवेनने महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. पहिल्या फेरीतील सामन्यात तिने अमांदा अॅनिसिमोव्हाचा 4-6, 6-4, 6-2 असा पराभव करत विजयी सलामी दिली. किनवेनने अलिकडेच पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले होते.

Advertisement
Next Article