महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जोकोविच, अल्कारेझ, व्हेरेव, गॉफ उपांत्यपूर्व फेरीत

06:55 AM Jan 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस, बोपण्णा-शुई उपांत्यपूर्व फेरीत

Advertisement

वृत्तसंस्था/ मेलबर्न

Advertisement

2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरु असलेल्या पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत सर्बियाचा माजी टॉप सिडेड जोकोविच तसेच स्पेनचा अल्कारेझ आणि जर्मनीचा अॅलेक्सझांडेर व्हेरेव यांनी पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मिश्र दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याची चीनची साथिदार झेंग शुई यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. जेरी लिहेका, हम्बर्ट, फोकिना यांचे आव्हान चौथ्या फेरीतच समाप्त झाले. महिला एकेरीत अमेरिकेची कोको गॉफ तसेच स्पेनची पाओला बेडोसा यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.

सर्बियाच्या अनुभवी आणि माजी टॉप सिडेड जोकोविचने रविवारी चौथ्या फेरीतील सामन्यात जेरी लिहेकाचा 6-3, 6-4, 7-6 (7-4) अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत शेवटच्या 8 खेळाडूत स्थान मिळविले. हा सामना 2 तास 40 मिनिटे चालला होता. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या इतिहासामध्ये पुरुष एकेरीत सर्वाधिक वेळा उपांत्यपूर्व फेरी गाठत विक्रम करणाऱ्या स्विसच्या रॉजर फेडररशी जोकोविचने बरोबरी साधली. जोकोविचने या स्पर्धेत आतापर्यंत 15 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे. आता स्पेनचा अल्कारेझ आणि जोकोविच यांच्यात उपांत्यपूर्व फेरीची लढत होईल. जोकोविचने चौथ्या फेरीतील सामन्यात बेसलाईन खेळावर अधिक भर देताना 21 अनियंत्रित चुका केल्या.

चौथ्या फेरीतील अन्य एका सामन्यात स्पेनच्या माजी टॉप सिडेड अल्कारेझने जॅक ड्रेपरचा 7-5, 6-1 असा पराभव केला. हा सामना चालू असताना दुखापतीमुळे ड्रेपरने माघार घेतली. या स्पर्धेतील पहिल्या 3 सामन्यात ड्रेपरला प्रतिस्पर्ध्याविरुद्ध 5 सेट्समध्ये लढत द्यावी लागली होती. स्पेनच्या अल्कारेझने ग्रँडस्लॅम स्पर्धेत 10 व्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. एटीपीच्या मानांकनात अल्कारेझ सध्या तिसऱ्या स्थानावर आहे. अल्कारेझने 2024 साली फ्रेंच ग्रँडस्लॅम, 2023 आणि 2024 साली विम्बल्डन ग्रँडस्लॅम तर 2022 मध्ये अमेरिकन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकली होती.

जर्मनीच्या अॅलेक्सझांडेर व्हेरेवने रविवारी येथे पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. चौथ्या फेरीतील सामन्यात व्हेरेवने युगो हम्बर्टचा 6-1, 2-6, 6-3, 6-2 अशा चार सेट्समध्ये लढतीत पराभव केला. एटीपीच्या मानांकना दुसऱ्या स्थानावर असलेला व्हेरेवला अद्याप ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवता आलेले नाही. व्हेरेवने या सामन्यात 19 बिनतोड सर्व्हिस तसेच 43 विजयी फटक्यांची नोंद केली. फ्रान्सच्या हम्बर्टला शेवटच्या दोन सेट्समध्ये आपली सर्व्हिस अधिक वेळ राखता न आल्याने त्याला पराभव पत्करावा लागला. व्हेरेवने गेल्या नोव्हेंबरमध्ये पॅरिस मास्टर्स टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविले होते. ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेत व्हेरेवने यावेळी पौली, मार्टिनेझ, फर्नेली यांना पराभूत केले. आता व्हेरेवचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना अमेरिकेच्या 12 व्या मानांकित टॉमी पॉल बरोबर होणार आहे. टॉमी पॉलने चौथ्या फेरीतील सामन्यात स्पेनच्या होकिनाचे आव्हान 6-1, 6-1, 6-1 अशा सरळ सेट्समध्ये 87 मिनिटांत संपुष्टात आणले.

महिला एकेरीच्या रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या चौथ्या फेरीतील सामन्यात अमेरिकेच्या 20 वर्षीय कोको गॉफने 27 वर्षीय स्विसच्या बेलिंडा बेन्सीकचा 5-7, 6-2, 6-1 अशा सेट्समध्ये पराभव केला. हा सामना 2 तास 26 मिनिटे चालला होता. आतापर्यंत गॉफ आणि बेन्सीक यांच्यात 9 सामने झाले असून ते सर्व गॉफने जिंकले आहेत. या लढतीत बेन्सीकने पहिला सेट 62 मिनिटात जिंकला होता. आता गॉफचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना स्पेनच्या 11 व्या मानांकित बेडोसा बरोबर होणार आहे. बेडोसाने चौथ्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या डॅनिलोव्हिकचा 6-1, 7-6 (7-2) अशा सेट्समध्ये पराभव केला.

बोपण्णा-झँग शुआइ उपांत्यपूर्व फेरीत

पुरुष दुहेरीच्या रविवारी झालेल्या मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यात भारताचा रोहन बोपण्णा आणि चीनची झेंग शुई यांनी अमेरिकेचा टेलर टाऊनसेंड आणि मोनॅकोची हुगो नेईस यांचा पराभव केला. अमेरिकेच्या टाऊनसेंड आणि मोनॅकोची नेईस यांनी माघार घेतल्याने बोपण्णा आणि सुई यांना उपांत्यपूर्व फेरीसाठी पुढे चाल मिळाली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article