कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जोकोविच, अल्कारेझ, साबालेंका, रायबाकिना विजयी

06:58 AM Aug 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चंद्रशेखर-प्रशांत पुरुष दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत, लैला फर्नांडीस, राडुकानु पराभूत

Advertisement

वृत्तसंस्था / न्यूयॉर्क

Advertisement

2025 च्या टेनिस हंगामातील येथे सुरू असलेल्या शेवटच्या अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत पुरूष एकेरीत सर्बियाचा जोकोविच, स्पेनचा कार्लोस अल्कारेझ, तसेच महिलांच्या विभागात बेलारुसची आर्यना साबालेंका, इलेसी रायबाकीना, जेसिका पेगुला यांनी चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. पुरुष दुहेरीमध्ये भारताच्या अनिरुद्ध चंद्रशेखर आणि विजय प्रशांत यांनी दुसऱ्याफेरीत प्रवेश मिळविताना अमेरिकेच्या हॅरिसन आणि किंग यांचा पराभव केला. अझारेंका, राडुकानु, पावोलिनी यांचे आव्हान संपुष्टात आले.

पुरूष एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात सर्बियाच्या जोकोविचने ब्रिटनच्या बिगर मानांकीत कॅमेरुन नुरीचा 6-4, 6-7 (4-7), 6-2, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव करत चौथी फेरी गाठली. 38 वर्षीय जोकोविच आता विक्रमी 25 वे ग्रँडस्लॅम जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. जोकोविचने आतापर्यंत ही स्पर्धा चारवेळा जिंकली आहे. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात स्पेनच्या कार्लोस अल्कारेझने इटलीच्या लुसीयानो डेअरडेरीवर 6-2, 6-4, 6-0 अशा सरळ सेट्समध्ये मात करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळविला. अमेरिकेच्या बेन शेल्टनला दुखापतीमुळे तिसऱ्या फेरीतील सामना अर्धवट सोडून द्यावा लागल्याने फ्रान्सच्या अॅड्रीयन मॅनेरिनोने एकेरीची चौथी फेरी गाठली. मॅनेरिनोने हा सामना 3-6, 6-3, 4-6, 6-4 असा जिंकला.जर्मनीच्या जेन लिनार्ड स्ट्रपने अमेरिकेच्या टिफोईचा 6-4, 6-3, 7-6 (7-5) असा फडशा पाडत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. आता टेलर फ्रित्झ या एकमेव टेनिसपटूच्या कामगिरीवर अमेरिकेचे आव्हान अवलंबून राहील. टेलर फ्रित्झचा तिसऱ्या फेरीतील सामना जेरोमी किमबरोबर होत आहे. तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात लिहेकाने कॉलिंगनॉनचा 6-4, 6-4, 6-4 तर रिंडेरकेनिचने बाँझीचा 4-6, 6-3, 6-3, 6-2 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले.

महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात बेलारुसच्या साबालेंकाने कॅनडाच्या लैला फर्नांडीसचा 6-3, 7-6 (7-2) अशा सेट्समध्ये पराभव करत चौथी फेरी गाठली आहे. या स्पर्धेतील विद्यमान विजेती साबालेंका आता सलग दुसऱ्यांदा जेतेपदाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तब्बल 10 वर्षांपूर्वी अमेरिकेच्या सेरेना विलियम्सने ही स्पर्धा सलग दोनवेळा जिंकली होती.

महिला एकेरीच्या तिसऱ्या फेरीतील अन्य एका सामन्यात रायबाकिनाने राडुकेनुचा 6-1, 6-2 असा एकतर्फी पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या जेसिका पेगुलाने व्हिक्टोरिया अझारेंकाचे आव्हान 6-1, 7-5 असे संपुष्टात आणत चौथी फेरी गाठली. व्होंड्रोसोव्हाने पाओलीनीचा 7-6 (7-4), 6-1 असा पराभव करत चौथ्या फेरीत स्थान मिळविले. इलेसी मर्टन्सचे आव्हान तिसऱ्या फेरीतच संपुष्टात आले. बुस्काने मर्टन्सचा 3-6, 7-5, 6-3 असा पराभव केला. टाऊनसेंडने मिराअॅन्ड्रीव्हाचे आव्हान 7-5, 6-2 असे संपुष्टात आणले. क्रेसिकोव्हाने इमा नेव्हारोचा 4-6, 6-4, 6-4 असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश केला.

चंद्रशेखर-प्रशांतची विजयी सलामी

भारताच्या अनिरूद्ध चंद्रशेखर आणि विजय प्रशांत यांनी पुरूष दुहेरीत विजयी सलामी देताना अमेरिकेच्या हॅरिसन व किंग यांचा पराभव केला. पहिल्याफेरीतील सामन्यात अनिरुद्ध आणि प्रशांत या जोडीने हॅरिसन आणि किंग यांचा 3-6, 6-3, 6-4 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. हा सामना 100 मिनिटे चालला होता. आता चंद्रशेखर आणि प्रशांत या जोडीचा दुसऱ्या फेरीतील सामना ऑस्ट्रेलियाचा स्मिथ आणि ब्राझीलचा रोमबोली यांच्याशी होणार आहे. या स्पर्धेत भारताच्या ऋत्विक बोलीपल्ली आणि एन. बालाजी यांचे पुरूष दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. स्टिव्हन्स आणि किरकोव्ह या जोडीने बोलीपल्ली आणि बालाजी यांचा 6-3, 6-7 (10-12), 6-4 असा पराभव केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article