जोकोविच, अल्कारेझ, साबालेन्का तिसऱ्या फेरीत
06:05 AM Aug 29, 2025 IST
|
Tarun Bharat Portal
24 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविणाऱ्या जोकोविचने स्वाज्दावर 6-7 (5-7), 6-3, 6-3, 6-1 अशी मात केली. ग्रँडस्लॅम स्पर्धांची तिसरी फेरी गाठण्याची त्याची ही 75 वी वेळ असून त्याने याबाबतीत रॉजर फेडररला मागे टाकले. त्याची पुढील लढत कॅमेरॉन नोरीशी होईल. ब्रिटनच्या नोरीने अर्जेन्टिनाच्या फ्रान्सिस्को कोमेसानावर पाच सेट्सच्या झुंजीत 7-6 (7-5), 6-3, 6-7 (0-7), 7-6 (7-4) असा विजय मिळविला. चार तास ही झुंज रंगली होती. 12 व्या मानांकित कॅस्पर रुडला बेल्जियमच्या कोलिंग्ननने 6-4, 3-6, 3-6, 6-4, 7-5 असे नमवित तिसरी फेरी गाठली. जागतिक क्रमवारीत 107 व्या क्रमांकावर असून त्याने आजवर ग्रँडस्लॅममध्ये एकदाही पाच सेट्सची लढत जिंकलेली नाही. दुसऱ्या मानांकित कार्लोस अल्कारेझने दीड तासाच्या लढतीत 65 व्या मानांकित मॅटिया बेलुसीचा 6-1, 6-0, 6-3 असा फडशा पाडत तिसरी फेरी गाठली. ग्रँडस्लॅमच्या दुसऱ्या फेरीतील त्याचा हा सलग 24 वा विजय आहे. त्याने फ्रेंच ओपन व विम्बल्डन स्पर्धा जिंकल्या आहेत. पहिल्या फेरीच्या सामन्यात जॅक ड्रेपरने अर्जेन्टिनाच्या फेडेरिको ऑगस्टिन गोमेझचा 6-4, 7-5, 6-7 (7-9), 6-2 असा पराभव केला. दुसऱ्या फेरीत त्याची लढत झिझू बर्ग्सशी होईल. महिला एकेरीत टेलर टाऊनसेंडने एलेना ओस्टापेन्कोचा 7-5, 6-1 असा पराभव केला. सामना संपल्यानतर दोघींमध्ये कोर्टच्या बाजूला बरीच शाब्दिक वादावादी झाली. अन्य सामन्यात आर्यना साबालेन्काने कुडरमेटोव्हाचा 7-6 (7-4), 6-2, अॅन लीने बेलिंडा बेन्सिकचा 6-3, 6-3, लैला फर्नांडेझने जॅक्वेमोलचा 2-6, 6-3, 6-2, व्होन्ड्रूसोव्हाने केसलरचा 7-6 (9-7), 6-2, जस्मिन पाओलिनीने जोविचचा 6-3, 6-3, मायरा अँड्रीव्हाने पोटापोव्हाचा 6-1, 6-3, एलिस मर्टेन्सने एल. सुनचा 6-2, 6-3, रायबाकिनाने व्हॅलेन्टोव्हाचा 6-3, 7-6 (9-7), क्रेसिकोव्हाने उचिजिमाचा 6-4, 6-2, जेसिका पेगुलाने ब्लिन्कोव्हाचा 6-1, 6-3 असा पराभव केला.
Advertisement
अमेरिकन ओपन टेनिस : अँड्रीव्हा, पाओलिनी, रायबाकिना, पेगुला, मर्टेन्स यांचीही आगेकूच, कॅस्पर रुड, बेन्सिक स्पर्धेबाहेर
Advertisement
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
Advertisement
अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेतील सलग दुसऱ्या सामन्यात जोकोविचला विजयासाठी संघर्ष करावा लागला. त्याने तिसरी फेरी गाठताना अमेरिकेच्या पात्रतेतून आलेल्या झाचारी स्वाज्दाचा पराभव केला. याशिवाय महिला एकेरीत टेलर टाऊनसेंड, आर्यना साबालेन्का, अँड्रीव्हा, जेसिका पेगुला, जस्मिन पाओलिनी, रायबाकिना, कार्लोस अल्कारेझ, कॅमेरॉन नोरी यांनीही तिसरी फेरी गाठली तर कॅस्पर रुड, एलेना ओस्टापेन्को, बेलिंडा बेन्सिक यांचे आव्हान संपुष्टात आले.
Advertisement
Next Article