For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द

06:49 AM Oct 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
एसटीची दिवाळीतील हंगामी भाडेवाढ रद्द
Advertisement

महामंडळाचा मोठा निर्णय राज्यातील प्रवाशांना दिलासा

Advertisement

प्रतिनिधी/ मुंबई

एसटी महामंडळाकडून दरवर्षी दिवाळीत 10 टक्के भाडेवाढ केली जाते. मात्र प्रवाशांची गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. महामंडळाने जाहीर केलेली 10 टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी महामंडळाने एसटीची भाडेवाढ लागू केली होती. मात्र सोमवारी महामंडळाने भाडेवाढ रद्द करत एसटीच्या प्रवाशांना दिलासा दिला आहे. राज्यभरातील प्रवाशांना या निर्णयामुळे फायदा होणार आहे.

Advertisement

दिवाळीत केली जाणारी हंगामी भाडेवाढ रद्द केल्यामुळे एसटी महामंडळाला मिळणारी अतिरिक्त रक्कम यंदा मिळणार नाही. मात्र या निर्णयाचा प्रवाशांना फायदा होणार आहे. या भाडेवाढीमुळे एसटीचा लांब पल्ल्याचा प्रवास महागणार होता. परंतु आता एसटीच्या तिकीटाचे दर ‘जैसे थे’ अवस्थेत राहतील.

दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक कुटुंबे गावी, पर्यटनस्थळांना भेटी देण्याचे बेत आखतात. दिवाळीला जोडून आलेल्या सुट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन महामंडळ दरवर्षी जादा गाड्यांची घोषणा करते. दिवाळी आणि उन्हाळी हंगामातील गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ करत असते. महामंडळाच्या धोरणानुसार गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन गर्दीतून उत्पन्न वाढीसाठी महामंडळ दरवर्षी हंगामी भाडेवाढ केली जात असते, त्या प्रमाणे यावर्षी देखील निर्णय घेण्यात आला होता. आता तो निर्णय रद्द करण्यात आला आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा

यंदा देखील 25 ऑक्टोबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान 10 टक्के हंगामी भाडेवाढ करण्यासंदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आलं होते. एसटीची प्रस्तावित 10 टक्के भाडेवाढ विठाई, शिवशाही, निमआराम बसेससाठी लागू होती. मात्र, ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे. मुंबई ते पुणे मार्गावर शिवनेरीकरीता भाडेवाढ लागू करण्यात आलेली नव्हती. सध्या दिवसाला सुमारे 23 ते 24 कोटी रुपयांचे प्रवासी उत्पन्न महामंडळाला मिळते. हंगामी भाडेवाढीमुळे दिवसाचे उत्पत्र 6 कोटी रुपयांनी वाढण्याची शक्यता होती. त्यामुळे महिन्याभरात महामंडळाला 950 ते एक हजार कोटी रुपयांचा महसूल मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, सध्या घेण्यात आलेल्या निर्णयामुळे अतिरिक्त महसुल मिळणार नाही. याउलट दिवाळीमधील सणांच्या काळात सर्वसामान्य प्रवाशी एसटीला प्राधान्य देत असतात. 10 टक्के हंगामी भाडेवाढीमुळे प्रवाशांना आर्थिक फटका सहन करावा लागत असे. पण महामंडळाच्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Advertisement
Tags :

.