महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अफगाणच्या गुरबाजची हिंदुस्थानात अशीही दिवाळी!

06:22 AM Nov 14, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अहमदाबादमध्ये केली गरिबांना मदत : सोशल मीडियावर अनेक चाहत्यांकडून कौतुक

Advertisement

वृत्तसंस्था/ अहमदाबाद

Advertisement

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये अफगाणिस्तान संघाने अनेक नामवंत संघांना धक्के देत जबरदस्त कामगिरी केली. एकामागून एक अनेक चॅम्पियन संघांना पराभूत करून आपण कोणत्याही संघाला पराभूत करण्यास सक्षम असल्याचे दाखवून दिले. अफगाणिस्तान उपांत्य फेरीच्या शर्यतीत होता, पण शेवटी सहाव्या स्थानावर राहून त्यांनी आपला वर्ल्डकपमधील प्रवास संपवला. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर शनिवारी मॅच पार पडली. या सामन्यानंतर अफगाणचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने जे केलं त्याची जगभर चर्चा सुरु असून त्याच्या संवेदनशीलतेचे कौतुकही होत आहे.

अफगाणचा 21 वर्षीय सलामीवीर गुरबाज यंदा वर्ल्डकपच्या निमित्तानं भारतात आला. सध्या भारतात दिवाळीचं वातावरण असताना त्याने अहमदाबादमधील बेघर नागरिकांप्रती दयाळूपणा दाखवत मदत केली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. गुरबाजने अहमदाबादच्या रस्त्यांवर राहणाऱ्या लोकांना दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे दिले. शनिवारी उत्तररात्रीच्या 3 च्या सुमारास तो एकटाच अहमदाबादच्या रस्त्यांवर उतरला आणि फुटपाथवर झोपलेल्या गरीब लोकांकडे जावून पैसे वाटले. त्यावेळी सगळे झोपलेले होते, फक्त एक महिला जागी होती. गुरबाजने झोपलेल्या गरीब लोकांच्या शेजारी 500 रुपयांच्या नोटा ठेवल्या, तर जागी असलेल्या महिलेच्या हातात पैसे दिले आणि शांतपणे गाडीत बसून निघून गेला. याचवेळी लव शहा या माणसाने गुरबाजला ओळखले आणि दुरूनच त्याने त्याचा व्हिडिओ बनवला. हा सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला असून अनेकांनी त्याचे कौतुक केले आहे.

दरम्यान, गुरबाज भारतातही खूप लोकप्रिय आहे. अफगाणिस्तानचा सर्वात लोकप्रिय खेळाडू राशिद खान व्यतिरिक्त, रहमानउल्ला गुरबाज आयपीएलमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. तो कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळतो. केकेआर संघानेही त्याच्या अभिमानास्पद कामगिरीचे ट्विट करत कौतुक केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article