For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

12:21 PM Oct 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
तरुण भारतच्या दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन
Advertisement

दर्जेदार साहित्याची मेजवानी देण्याची परंपरा कायम

Advertisement

बेळगाव : दै. तरुण भारतच्या कार्पोरेट दिवाळी अंकाचे बुधवारी सायंकाळी हिंडलगा कार्यालयात मोठ्या थाटामाटात प्रकाशन झाले. यावेळी व्यासपीठावर संपादक विजय पाटील, दिवाळी अंक संपादनप्रमुख बालमुकुंद पतकी, व्यवस्थापक गिरीधर रविशंकर, सीएमओ उदय खाडिलकर आणि प्रमुख प्रतिनिधी मनीषा सुभेदार उपस्थित होते. व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. उपस्थितांचे स्वागत करून बालमुकुंद पतकी यांनी दिवाळी अंकाबद्दल माहिती दिली.

ते म्हणाले, यावर्षीच्या दिवाळी अंकात मान्यवर आणि नवोदित अशा 19 लेखक, लेखिकांच्या कथा आहेत. यामध्ये सुभाष सुंठणकर, प्रा. सुहास बारटक्के, कल्लाप्पा जोतिबा पाटील, विलास गावडे, प्रतिभा सडेकर, अस्मिता अतुल देशपांडे, डी. व्ही. अरवंदेकर, सुधीर सुखटणकर, राधामिलिंद, उज्ज्वला दीपक वेदपाठक, गौरी भालचंद्र, उन्नती गाडगीळ, श्रीया निलेश पंडित, उज्ज्वला केळकर, सुरेश पाचकवडे, राजेंद्र अत्रे, रेश्मा राणे-जाधव, विजय तरवडे, संध्या सूर्यकांत धर्माधिकारी यांच्या कसदार कथांचा समावेश आहे.

Advertisement

कविता विभागात अनुपमा उजगरे, प्रा. माधव सटवाणी, प्रा. प्रतिभा सराफ, मीना वडेर, हर्षदा सुंठणकर, कल्पना बांदेकर, कविता आमोणकर, अनुराधा नेरूरकर, उज्ज्वला देशपांडे, संजीवनी बोकील, अंजली देशपांडे, उर्मिला शहा, मारुती कटकधोंड, हेमंत डांगे, मोहन काळे, शंकर विटणकर, डॉ. अलका हेजिब-अगेरा, डॉ. दिलीप पां. कुलकर्णी, लोचन पुराणिक (प्रितमपूर-मध्य प्रदेश), माधव गवाणकर, स्नेहल नाडकर्णी, शमिका नाईक, डॉ. सुनीता चव्हाण, संध्या पुजारी, वेदा लक्ष्मण पत्की, पुष्पा नंदकिशोर पोरे, सुभाष जोशी, पूजा लक्ष्मण पत्की, वृंदा भांबुरे, मंगेश मंत्री, शरद अत्रे, वंदना हुळबत्ते, अस्मिता केळकर, प्रकाश क्षीरसागर, राजकुमार कवठेकर, चंद्रशेखर पटवर्धन आणि डॉ. दिलीप इंगोले वगैरेंच्या कविता आहेत.

व्यंगचित्र : समाजमनाचा आरसा-सूर्यकांत कामून, इंग्रज वकील 

ऑक्झिंडेनची अयशस्वी खेळी-राजश्री शिरोडकर, सूर्यपक्षी-डॉ. अनुजा जोशी, सर्वज्ञ न्या. महादेव गोविंद रानडे-डॉ. योगेश शास्त्राr, शोध मूळ महाभारताचा-सुधीर जोगळेकर, राष्ट्र संतांचे खंजिरी भजन-डॉ. सुनीलकुमार सरनाईक, सुजाण पालकत्व-अनघा तांबोळी, बहिणाबाईंचे यक्षप्रश्न : मन व माणूस-प्रवीण दवणे यांचे वेगवेगळ्या विषयांवरील आठ लेख आहेत. या अंकामध्ये वडील-मुलगी, आई-मुलगी तसेच बहिणी-बहिणी अशा लेखक, कवी यांच्या साहित्याचा आगळा संगम जुळून आला आहे. गिरीधर रविशंकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाला तरुण भारतमधील विविध विभागप्रमुख तसेच परिवारातील अन्य सदस्य उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.