Solapur : सोलापूरकरांसाठी दिवाळी भेट! तिरुपतीसाठी विशेष गाडी जालनामार्गे धावणार
जालना-तिरूपती एक्स्प्रेसची भेट
सोलापूर : तिरुपती श्री बैंकटेश्वर बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या सोलापूरकरांसाठी आणि जालनाला जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठी दिलासादायक बातमी दिली आहे. दक्षिण मध्य रेल्वेने सोलापूर-तिरुचनूर (तिरुपती) मार्गे साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस गाडी सुरू करण्याची घोषणा केली आहे.
या गाडीमुळे पहिल्यांदाच सोलापूरकरांना जालना मार्गे थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. ही विशेष सेवा १९ ऑक्टोबरपासून १ डिसेंबर २०२५ दरम्यान चालवली जाणार आहे. दिवाळी सुट्टीसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाने ही गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूरहून दररोज हजारो भाविक तिरुपतीच्या दर्शनासाठी जातात. सोलापूरमधून तिरुपतीला जाणाऱ्या सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये प्रवाशांची गर्दी असते. पण दक्षिण मध्य रेल्वे नव्याने सुरू केलेल्या गाड्यांमुळे तिरुपती आणि जालनाला जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
जालनाला आतापर्यंत रेल्वेने थेट कनेक्टिव्हिटी नसल्याने प्रवासात अडचणी येत होत्या. नव्याने सुरू होणाऱ्या या विशेष गाडीमुळे सोलापूर, बार्शी, लातूर आणि धाराशिवकरांसाठी जालनाला जाण्याचा प्रवास अधिक सोयीस्कर, आरामदायी आणि आर्थिकदृष्ट्या परवडणारा ठरणार आहे.
याशिवाय गाडी क्रमांक ०७६५३ जालना ते तिरुचनूर साप्ताहिक स्पेशल (प्रती रविवार) धावण्याची तारीख : १९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर २०२५. मार्ग जालना, परभणी, परळी, लातूर, बार्शी, कुडुवाडी, सोलापूर, कलबुर्गी, गुंतकल, धर्मवरम, तिरुपती-तिरुचनूर (तिरुपती जवळ). गाडी क्रमांक ०७६५४ तिरुचनूर ते जालना साप्ताहिक स्पेशल (प्रती सोमबार) धावण्याची तारीख : २० ऑक्टोबर ते १ डिसेंबर २०२५. मार्ग रेणिगुंटा, राजमपेटा, गुंटकल, कलबुर्गी, सोलापूर, कुडूवाडी, बार्शी, लातूर, परळी, परभणी, जालना, असा प्रवास असेल.