कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये दिवाळी महोत्सवाचे आयोजन

06:40 AM Oct 19, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या शिवाजी स्टेडियममध्ये नुकतेच दिवाळी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये आनंद, एकता, भारतीय सैन्याची नीतिमत्ता आणि मराठा रेजिमेंटच्या गौरवशाली वारशाचे दर्शन घडविण्यात आले. मिलिटरी स्टेशनसोबत ज्युनियर लिडर विंगचे सदस्यही या महोत्सवामध्ये सहभागी झाले होते. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी व मृणालिनी मुखर्जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाची सुरुवात झाली. यावेळी सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी मनोरंजक खेळ तसेच स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

विजेत्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे वितरित करण्यात आली. यानंतर भव्य आतषबाजी करून दिवाळी सणाचा आनंद साजरा करण्यात आला. यावेळी मराठा इन्फंट्रीचे अधिकारी, जवान, त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article