महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

धाराशिवचा दुहेरी मुकुटासह दिवाळी धमाका

06:00 AM Nov 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुमार व मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा : धाराशिवचे कुमार गटात पहिले तर मुलींच्या गटात चौकारासह आठवे विजेतेपद

Advertisement

धाराशिव : यजमान धाराशिवने सुवर्ण महोत्सवी (50 वी) कुमार व मुली (ज्युनिअर) राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो खो स्पर्धेत कुमार व मुली या दोन्ही गटातून  विजेतेपद पटकावित दुहेरी मुकुट संपादिला. सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडूसाठी असलेला सावित्री पुरस्कार तन्वी भोसले हिने व विवेकानंद पुरस्कार सोत्या वळवी या धाराशिवच्याच खेळाडूंनी पटकाविले. मुलींच्या गटात सोलापूर, ठाणे तर मुलांच्या गटात सोलापूर व पुण्याने अनुक्रमे तृतीय व चतुर्थ स्थान संपादिले.

Advertisement

धाराशिवने कुमारगटात पहिलेच विजेतेपद पटकावले असून मुलींच्या गटात विजेतेपदाच्या चौकारासह (2021-22 पासून सलग चौथे विजेतेपद) तर एकूण आठवे विजेतेपद मिळवत सुवर्णमहोत्सवी वर्षात दुहेरी विजेतेपदासह दिवाळी धमाका साजरा केला. यापूर्वी 2015-16 साली जळगाव येथे झालेल्या 43 व्या स्पर्धेत ठाण्याने दुहेरी मुकुट मिळवला होता त्यानंतर तब्बल सहा अजिंक्यपद स्पर्धांनंतर धाराशिवला हा इतिहास घडवता आला. यजमान म्हणून सुध्दा दुहेरी मुकुट मिळवणारा धाराशिव हा पहिला संघ ठरला व प्रेक्षकांनी दिवाळीत विजयोत्सव साजरा करताना आकाश आतीशबाजीच्या विविध रंगांनी भरून टाकले.

या स्पर्धेत प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त गर्दीत झालेल्या मुलींच्या अंतिम सामन्यात धाराशिवने सांगलीचा 11-9 असा 2 गुणांनी पराभव केला. मध्यंतराची 6-4 ही 2 गुणांची आघाडीच त्यांना विजय मिळवून देऊन गेली. धाराशिवकडून अश्विनी शिंदेने 4.00 व 2.10 मिनिटे संरक्षण करताना आक्रमणात 6 गुण मिळवत प्रेक्षकांना दिवाळीत फटके फोडण्याचा आनंद द्विगुणीत करून दिला. तन्वी भोसलेने 1.20 आणि 2.10 मिनिटे संरक्षण केले. मैथिली पवारने  1.10 व 1.40 मिनिटे संरक्षण केले. सुहानी धोत्रेने आक्रमणात 3 खेळाडू बाद करताना विजेतेपदाचा धमाका उडवून दिला. तर पराभूत सांगली कडून सानिका चाफेने अष्टपैलू कामगिरी करताना 3.10  व 1.40 मिनिटे संरक्षण करून आक्रमणात 3 गुण मिळवत “हम भी किसीसे कम नही“ या अविर्भावात कामगिरी नोंदवली.

मुलांच्या गटातही धाराशिवचे वर्चस्व

मुलांच्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यात जादा डावांमध्ये धाराशिवने सांगलीवर  23-22 असा 2.30 मिनिटे राखून 1 गुणाने विजय साजरा करताना पहिले वाहिले विजेतेपद खेचून आणले. शेवटपर्यंत उत्कंठावर्धक ठरलेल्या या सामन्यात मध्यंतराला 10-7 अशी तीन गुणांची आघाडी धाराशिवकडे होती. त्यानंतर मात्र, सांगली संघाने दुस्रया डावात जोरदार मुसंडी मारत आक्रमण केले व धाराशिवला 16-16 असे बरोबरीत रोखले. जादा डावात मात्र धाराशिवने 2.30 मिनिटे राखून 7-6 अशी बाजी मारली. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सिने अभिनेत्री भार्गवी चिरमुले, सोलापूरचे पोलिस उपअधिक्षक दूलबा ढाकणे यांच्या हस्ते करण्यात आला.

सर्वोत्कृष्ट खेळाडू

अष्टपैलू: सोत्या वळवी, तन्वी भोसले (धाराशिव). संरक्षक : विलास वळवी (धाराशीव), सानिका चाफे (सांगली). आक्रमक : अश्विनी शिंदे (धाराशिव),प्रज्वल बनसोडे (सांगली).

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article