महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर तालुक्यात प्रकाशपर्वाला सुरुवात

11:39 AM Oct 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बालचमूंना किल्ले बनवण्याची लगबग : बाजारपेठेत दुकाने सजली : दीपावलीच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची गर्दी 

Advertisement

खानापूर : खानापूर शहरासह तालुक्यात सोमवारपासून प्रकाश पर्वाला सुरुवात झाली आहे. सगळीकडे चैतन्याचे आणि आनंदाचे वातावरण पसरले असून शहरासह ग्रामीण भागात दिवाळीची धामधूम सुरू असून बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. तसेच बालचमू किल्ला बनवण्यात गर्क झाले आहेत. तर घराघरातून फराळाचा सुवास दरवळत आहे. त्यामुळे वातावरण पूर्णपणे उत्सवमय झाले आहे. शहरात दीपावलीच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात स्टॉल्स लागले असून यात रांगोळी, आकाश कंदील, किल्ल्याचे मावळे, उटणे, साबण, सुवासिक तेल याची खरेदी होताना दिसून येत आहे.

Advertisement

सोमवारपासून रमा एकादशी, वसुबारसपासून दीपावली उत्सवाला सुऊवात झाली आहे. प्रथमच शहरात वसुबारसच्या निमित्ताने आरएसएसच्यावतीने गायीचे पूजन करण्यात आले. तर मंगळवारी धनत्रयोदशीनिमित्त घरोघरी पूजन करण्यात आले. तसेच डॉक्टरांनी आपल्या दवाखान्यात धन्वंतरीचे पूजन केले. गुरुवार दि. 31 रोजी नरक चतुर्थीदशी दीपावली आहे. या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान आणि आरती ओवाळण्यात येणार आहे. तर शुक्रवार दि. 1 रोजी अमावस्या असल्याने लक्ष्मी पूजनाचा मुहूर्त असल्याने शहरासह तालुक्यातील व्यापारी आणि घरोघरी लक्ष्मीचे पूजन करण्यात येणार आहे. तर शनिवार दि. 2 रोजी बलिप्रतिपदा (दिवाळी पाडवा) साजरी करण्यात येणार आहे. रविवार दि. 3 रोजी भाऊबीज असल्याने भावा बहिणीतील अतुट नात्याची ओवाळणी घरोघरी होणार आहे. यावर्षी दीपावलीचा पर्व सलग पाच दिवस असल्याने सर्वत्र आनंदाला उधाण आले आहे.

बाजारात आकर्षक आकाश कंदील

शहरात दीपावलीच्या साहित्याने दुकाने सजली असून मोठमोठे स्टॉलही लावण्यात आले आहे. यात वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील, विद्युतरोषणाईचे साहित्य, विविध नमुन्यांचे आणि आकाराच्या रंगीबेरंगी पणत्या, अनेक रंगाच्या रांगोळ्याचे साचे, सुंगधीत उटणे, साबण, तेल यासह इतर साहित्यांने दुकाने सजली आहेत. दीपावलीच्या साहित्याची खरेदी मोठ्याप्रमाणात होत आहे. तसेच कापड दुकानातही खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. तर किराणा दुकानातही दीपावलीच्या साहित्यासाठी गर्दी होत आहे. सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे.

खानापूर शहरातील स्टेशनरोड, बाजारपेठ तसेच इतर भागातील दुकानांवर लक्ष्मी पूजनानिमित्त विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. खानापूर शहरातील विठ्ठल मंदिरात अश्विन प्रतिपदेपासून काकड आरतीला प्रारंभ झाला आहे. दीपावलीचे औचित्य साधून विठ्ठल मंदिरातील काकड आरतीलाही बरीच गर्दी होत आहे. चार दिवसांपासून हवामानात एकदम बदल झाला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनला होता.मात्र गेल्या चार दिवसापासून हवामानात पूर्णपणे बदल झाला असून दिवसभर कडक ऊन पडत असून सकाळी आणि सायंकाळी थोड्या प्रमाणात थंडी जाणवत आहे. पावसाने उघडीप दिल्याने भातकापणीसाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे. भातपीक पावसामुळे नुकसान होऊ नये म्हणून माळरान तसेच पानथळ जमिनीतील भातकापणी जोरात सुरू करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article