दिव्यानशीला विजेतेपद
वृत्तसंस्था / क्लुज-नेपोका (रोमानिया)
येथे सुरू असलेल्या 2025 च्या आयटीटीएफ विश्व युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताची नवोदित युवा महिला टेबल टेनिसपटू दिव्यानशी भौमिकने मुलींच्या 15 वर्षांखालील वयोगटात एकेरीमध्ये पदक मिळविले.
उपांत्यफेरीच्या सामन्यात चीनच्या झू क्विहुईने दिव्यानशीचा 4-1 (10-12, 12-10, 11-6, 11-4, 11-4) अशा सेट्समध्ये पराभव केला. या स्पर्धेमध्ये भारताच्या भौमिकने युरोप, कोरिया आणि जपानच्या स्पर्धकांवर शानदार विजय मिळविले होते.उझबेकमधील ताश्कंद येथे झालेल्या आशियाई युवा टेबल टेनिस चॅम्पियनशिप स्पर्धेत 15 वर्षीय दिव्यानशीने एकेरीचे जेतेपद पटकाविले होते. तर आता रुमानियातील स्पर्धेत तिने पुन्हा पदक मिळविले आहे. मुलांच्या 19 वर्षांखालील वयोगटात भारताच्या अंकूर भट्टाचार्यजी, ए. प्रधीवदी, पुनीत विश्वास आणि पी. भट्टाचार्य यांनी सांघिक विभागात भारताला ऐतिहासिक रौप्य पदक मिळवून दिले आहे.