अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर दुभाजकांना रंगरंगोटी
बेळगाव :
बेळगाव येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. हे अधिवेशन 8 डिसेंबरपासून होणार असून सत्ताधारी व विरोधकांची मांदियाळी बेळगावमध्ये होणार आहे. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून शहर परिसरासह विविध ठिकाणी कामे करण्यात येत असून रंगरंगोटीसह इतर कामे हाती घेण्यात आली आहेत. क्लब रोडवरील दुभाजकाला रंगरंगोटी करण्यात येत असून विविध कामे करण्यात येत आहेत.
बेळगाव येथील हिवाळी अधिवेशनाला 8 डिसेंबरपासून सुरुवात होणार असून दोन आठवडे चालणार आहे. अधिवेशनाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, आमदारांसह विविध अधिकाऱ्यांची मांदियाळी बेळगावमध्ये दाखल होते. याकाळात अनेक मान्यवर विविध ठिकाणी भेटी देत असतात. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून विविध कामे करण्यात येत आहेत. दुभाजकांना रंग लावणे, ख•s बुजविणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आदी कामे करण्यात येत आहेत.