For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

महिलांसाठी विभागीय तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा 28 मार्चपासून

06:29 AM Mar 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
महिलांसाठी विभागीय तीन दिवसीय क्रिकेट स्पर्धा 28 मार्चपासून
Advertisement

पुण्यात स्पर्धेला प्रारंभ होणार

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

महिलांच्या रेडबॉल क्रिकेटचे देशी मोसमात पुनरागमन झाले असून बीसीसीआयने त्यांच्यासाठी वरीष्ठ आंतरविभागीय ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. 28 मार्चपासून या स्पर्धेला पुण्यात सुरुवात होईल.

Advertisement

भारतीय महिला संघ पुन्हा कसोटी खेळू लागल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे भारताने अलीकडेच ऑस्ट्रेलिया व इंग्लंड संघांविरुद्ध कसोटी खेळल्या आहेत. देशी क्रिकेटमध्ये महिलांसाठी रेडबॉल क्रिकेट 2018 मध्ये शेवटचे आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रीय संघ पुन्हा कसोटी खेळू लागला असल्याने नव्या खेळाडूंना या क्रिकेटचा अनुभव मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावर स्पर्धा आयोजित करण्याचा आम्ही निर्णय घेतला, असे माजी वेगवान गोलंदाज अमिता शर्मा म्हणाल्या. केवळ विभागीय स्तरावर नव्हे तर राज्य स्तरावरदेखील रेडबॉल क्रिकेट खेळले जावे, असे मला वाटते, असेही त्या म्हणाल्या.

महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही स्पर्धा आयोजित करणार असून त्यान सहा संघांचा सहभाग असेल. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, मध्य व उत्तर-पूर्व असे हे विभागीय संघ असतील. प्रत्येक संघ पाच सामने खेळणार असून प्रत्येक सामना तीन दिवसांचा असेल. 2018 मध्ये दोन दिवसांचे सामने घेण्यात आले होते. सध्या सुरू असलेली महिला प्रिमियर लीग स्पर्धा 17 मार्च रोजी संपल्यानंतर लगेचच ही स्पर्धा पूर्व व उत्तर-पूर्व विभाग तसेच पश्चिम व मध्य विभाग यांच्यातील उपांत्यपूर्व सामन्यांनी सुरू होईल. 28 मार्चला दोन्ही सामने होणार असून एप्रिल 3 रोजी उपांत्य व 9 एप्रिल रोजी अंतिम लढत होईल.

Advertisement
Tags :

.