महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेदरलँड्समधील डायव्होर्स हॉटेल

06:25 AM Nov 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दांपत्य करते चेक-इन, घटस्फोट घेऊन चेक-आउट

Advertisement

विवाह संपुष्टात येण्याच्या वाढत्या प्रमाणादरम्यान एक नवा आणि अचंबित करणारा ट्रेंड उदयास येत आहे. आता घटस्फोट घेण्यासाठी महिन्यांपर्यंत न्यायालयाचे उंबरठे झिजविण्याची गरज नाही, तर एक केवळ एक वीकेंड पुरेसा आहे. नेदरलँड्समधील 33 वर्षीय उद्योजक जिम हाफेन्सने नवा बिझनेस मॉडेल सादर केला आहे. तेथे दांपत्य शुक्रवारी विवाहित म्हणून चेक इन करते आणि रविवारपर्यंत घटस्फोटित होत चेक आउट करते.

Advertisement

कसे काम करते डायव्होर्स हॉटेल

या अनोख्या हॉटेलमध्ये पूर्ण घटस्फोट पॅकेज मिळते. वकील आणि मध्यस्थांची टीम जोडप्यांची प्रतीक्षा करत असते. शुक्रवारी चेक इन करा, स्वत:चा विवाह संपुष्टात आणा आणि रविवारी घटस्फोटाच्या कागदपत्रांसोबत बाहेर पडा अशी ही ऑफर आहे. हे सर्वकाही एका निश्चित शुल्कात होते. या पूर्ण प्रक्रियेला रियलिटी टीव्ही शोमध्ये देखील बदलले जाऊ शकते.

का पडली गरज

हे हॉटेल अशाप्रकारचे वातावरण मिळवून देते, जेथे दांपत्याला सहजपणे घटस्फोट घेता येईल. घटस्फोटाच्या दीर्घ आणि किचकट कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाण्याऐवजी एक सोपा मार्ग येथे दिला जातो. हॉटेलमध्ये असे वातावरण आणि व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे, जी एकाचवेळी कायदेशीर सल्ला, मनोवैज्ञानिक सहाय्य आणि मेडिएशन पुरविते. याच्या माध्यमातून घटस्फोटाची प्रक्रिया कुठल्याही तणावाशिवाय लवकर आणि शांततापूर्ण मार्गाने संपविता येते.

आणखी शहरांमध्ये सुरू होणार हॉटेल

हे हॉटेल नेदरलँड्सच्या हर्मोन शहरात आहे. याला सेपरेशन इन या नावाने देखील ओळखले जाते. नेदरलँड्समध्ये या योजनेने प्रचंड प्रसिद्धी मिळविली आहे. यात 16 दांपत्यांनी आनंदाने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. आता  जिम अमेरिकेच्या शहरांमध्ये अशाप्रकारचे हॉटेल सुरू करण्याची तयारी करत आहे. तेथील न्यूयॉर्क आणि लॉस एंजिलिस यासारख्या शहरांमध्ये मोठी हॉटेल्स याकरता निवडली जात आहेत.

वकिलांचे काय म्हणणे

अमेरिकेतील प्रसिद्ध घटस्फोट विषयक वकील रॉबर्ट एस. कोहेन यांनी ही कल्पना ऐकण्यास जितकी आकर्षक वाटते, तितकीच अव्यवहार्य असल्याचे म्हटले आहे. घटस्फोटाचा कालावधी अत्यंत भावुक असतो, दोन दिवसात सर्वकाही सोडविणे सर्वांनाच शक्य नाही. याला एक बिझनेस आणि पॅकेज म्हणून सादर करणे अजिबात योग्य नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अमेरिकेत घटस्फोटाचा मोठा व्यवसाय

अमेरिकेत डायव्होर्स इंडस्ट्री 175 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. दरवर्षी 1.2 दशलक्ष लोक घटस्फोटासाठी अर्ज करतात. अशा स्थितीत डायव्होर्स हॉटेल या विशाल बाजारात खळबळ उडवून देणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article