For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिल्हा नोंदणी कार्यालयातील ऑपरेटरला लोकायुक्तांकडून रंगेहाथ अटक

10:58 AM Feb 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिल्हा नोंदणी कार्यालयातील ऑपरेटरला लोकायुक्तांकडून रंगेहाथ अटक
Advertisement

22 हजार रुपयांची केली होती मागणी

Advertisement

बेळगाव : जिल्हा नोंदणी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटरला 22 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी छापा टाकून कार्यालयात लाच स्वीकारताना ही कारवाई केली असून या कारवाईने एकच खळबळ माजली आहे. रॉय रोड, टिळकवाडी येथील अविनाश चिंतामणी धामणकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जिल्हा नोंदणी कार्यालयातील डाटा एंट्री ऑपरेटर सोमशेखर रुद्राप्पा मास्तमर्डी याला 22 हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे. लोकायुक्त पोलीसप्रमुख हणमंतराय यांनी ही माहिती दिली आहे. लोकायुक्त विभागाचे उपअधीक्षक भरत रे•ाr, पोलीस निरीक्षक निरंजन पाटील, पोलीस निरीक्षक उस्मान आवटी, अन्नपूर्णा हुलगूर, विजय बिराजनवर, व्ही. बी. बसक्री, आर. बी. गोकाक, संतोष बेडग, बसवराज कोडोळ्ळी आदींचा समावेश असलेल्या पथकाने ही कारवाई केली आहे. अविनाश व आनंद आजगावकर या दोघा जणांनी कंग्राळी बुद्रुकच्या कार्यक्षेत्रातील विद्यागिरी, बसवनगर येथे अमित बाबुराव घोरपडे यांचा प्लॉट खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम देऊन खरेदी करारपत्र केले आहे. ही मालमत्ता खरेदी करून देण्यासाठी अमित यांनी उत्सुकता दाखविली नाही. या व्यवहारासंबंधीचे चलन देण्यासाठी डाटा एंट्री ऑपरेटरने डीआर साहेबांना आणि आपल्याला 22 हजार रुपये लाच मागितली होती.

Advertisement
Advertisement
Tags :

.