For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दांडेली येथे ३१ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय भजन स्पर्धा

03:05 PM Oct 19, 2025 IST | अनुजा कुडतरकर
दांडेली येथे ३१ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
Advertisement

न्हावेली /वार्ताहर

Advertisement

श्री देव दाडोबा देवस्थान व ग्रामस्थ मंडळ,दांडेली आयोजित जिल्हास्तरीय भजन स्पर्धा शुक्रवार ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३० वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्री देव दांडेली देवस्थान प्रवेशद्वार जवळ येथे होणार आहे.

पुढीलप्रमाणे सहभागी भजन संघ
सायंकाळी ७ ते ७.३५ वाजता श्री देवी माऊली भजन मंडळ,साटेली ( बुवा - सत्यनारायण कळंगुटकर) सायंकाळी ७.४५ ते ८.३० वाजता श्री लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ,कणकवली ( बुवा - योगेश मेस्री ) रात्री ८.३० ते ९.५ वाजता श्री सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ,अणसूर वेंगुर्ला ( बुवा - हर्षल मेस्री ) रात्री ९.१५ ते ९.५० वाजता रामकृष्ण हरी भजन सेवा संघ पाट पंचक्रोशी ( बुवा - आशिष सडेकर) रात्री २०.३० ते ११.५ वाजता सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ,जानवली ( बुवा - दुर्गेश मिठबावकर) रात्री ११.१५ ते ११.५० वाजता रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ,घोटगे ( बुवा - हर्षद ढवळ) रात्री १२ ते १२.३५ वाजता श्री महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी यांचा समावेश आहे.प्रथम पारितोषिक १५,००० रुपये व कायमस्वरुपी चषक,द्वितीय पारितोषिक ११,००० रुपये व कायमस्वरुपी चषक,तृतीय पारितोषिक ७,००० रुपये व कायमस्वरुपी चषक तसेच उत्कृष्ट गायक,उत्कृष्ट हार्मोनियम,उत्कृष्ट पखवाज,उत्कृष्ट तबला,उत्कृष्ट झांजवादक,उत्कृष्ट कोरस,उत्कृष्ट शिस्तबद्ध संघ,उत्कृष्ट गजर यांना प्रत्येकी १००० रुपये तसेच प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह अशी बक्षीसे ठेवण्यात आली आहे.अधिक माहितीसाठी सचिन पांगम ८२७५३८१४८९ व ओंकार परब यांच्याशी संपर्क साधावा लाभ घेण्याचे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.