गोवेरीत २८ सप्टेंबर पासून जिल्हास्तरीय भजन स्पर्धा
वार्ताहर/कुडाळ
नवरात्रोत्सवानिमित्त गोवेरी येथील श्री देव सत्पुरूष कला-क्रीडा मंडळ, ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालय आणि देवस्थान कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर याकालावधीत सायंकाळी ७.४५ वाजता तेथीलच श्री देव सत्पुरूष मंदिर येथे 20 वी कै. वसंत गावडे बुवा स्मृती चषक जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील 16 भजन मंडळे सहभागी झाली आहेत.या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा 28 रोजी सायंकाळी ७ वाजता कुडाळचे उद्योजक संतोष सामंत, प्रभारी सरपंच स्वरा गावडे व सर्व ग्रा. पं. सदस्य तसेच देवस्थान मानकरी विठ्ठल गावडे, गोविंद गावडे, एकनाथ जाधव व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे.
स्पर्धेत सहभागी झालेली भजन मंडळे पुढीलप्रमाणे आहेत-
२८ रोजी सायंकाळी ७.४५ वाजता
मोरेश्वर मंडळ (नेरूर) चे भजन, रात्री ८.४५ वाजता दिर्बादेवी मंडळ (कोलगांव) चे भजन, ९.४५ वाजता
रामकृष्ण हरि महिला सेवा संघ (तेंडोली) चे भजन, १०.४५ वाजता भालचंद्र सोहम ग्रुप (कुडाळ) चे भजन,
२९ रोजी सायंकाळी ७.४५ वाजता
श्री देवी कालिका मंडळ (कारिवडे) चे भजन, रात्री ८.४५ वाजता श्री काशिकल्याण ब्राह्मणदेव मंडळ (वरची मळेवाड), ९.४५ वाजता श्री मुसळेश्वर मंडळ (मळेवाड) चे भजन, १०.४५ वाजता श्री ब्राह्मणदेव मंडळ (मळेवाड) चे भजन, ३० रोजी सायंकाळी ७.४५ वाजता श्री गणेशकृपा मंडळ (डिगस) चे भजन, रात्री ८.४५ वाजता श्री गुरुकुल संगीत मंडळ (कुडाळ) चे भजन, ९.४५ वाजता समाधीपुरूष मंडळ, (मळगाव) चे भजन, १०.४५ वाजता साई खोडदेश्वर मंडळ (पिंगुळी) चे भजन, १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.४५ वाजता स्वरसाधना मंडळ (डिगस) चे भजन, रात्री ८.४५ वाजता विघ्नहर्ता मंडळ (शेर्ले) चे भजन, ९.४५ वाजता गोठण मंडळ (वजराट) चे भजन, १०.४५ वाजता महापुरूष मंडळ (माड्याचीवाडी) यांची भजने होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या तीन स्पर्धकांना तसेच उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय आणि वैयक्तीक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी निमित्त दुपारी 2.30 वाजता सत्यनारायण महापूजा, आरती, तीर्थप्रसाद, सायंकाळी 7 वाजता ग्रामस्थांची भजने होणार आहेत. रात्री 9.30 वाजता भजन स्पर्धेचे पारितोषिक वितरण, रात्री 10.30 वाजता अष्टविनायक दशावतार मंडळ (निरवडे) यांचे नाटक होणार आहे.उपस्थित राहण्याचे आवाहन श्री श्री देव सत्पुरूष कला-क्रीडा मंडळ,ज्ञानदीप वाचनालय व ग्रंथसंग्रहालय व देवस्थान कमिटी यांनी केले आहे.