कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जिल्हाधिकारी कार्यालय नूतनीकरणाचे काम जलदगतीने

12:33 PM Dec 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयाचा विकास वेगाने सुरू आहे. यादृष्टीने विविध कामे कंत्राटदारांकडून हाती घेण्यात आली आहेत. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारातील पेव्हर्स काढण्याचे काम करण्यात येत होते. त्याचबरोबर पार्किंगसाठीही सुसज्ज जागा करण्यात येत असून जेसीबीच्या साहाय्याने माती काढण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. एकंदरीत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतनीकरणाचे काम जलदगतीने सुरू असून लवकरच सुसज्ज इमारतीचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

Advertisement

गेल्या अनेक दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम सुरू आहे.कार्यालयातील आतील भागासह बाहेरील भागाचेही सुशोभिकरण करण्यात येत आहे. कार्यालयाला संपूर्ण दगडी बांधकाम करण्यात येत असून जुने प्रवेशद्वारावरील पोर्च काढून त्याठिकाणी लोखंडी काम करण्यात येत आहे. तसेच कार्यालयासमोरील मुख्य रस्त्यावरील फूटपाथशेजारील संरक्षक भिंत काढून त्याठिकाणी सीसी बांधकाम करण्यात येणार आहे. पार्किंगच्यादृष्टीने समोरील भागाचे सपाटीकरणाचे काम सुरू आहे.

Advertisement

कार्यालयातील आतील भागात विविध विभागांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. जेणेकरून नागरिकांना सोयीचे होणार आहे. मंगळवारी कार्यालय आवारातील पेव्हर्स काढण्यात येत असल्याने गेट बंद करण्यात आल्याने सार्वजनिकांवर त्याचा काही प्रमाणात परिणाम झाल्याचे दिसून आले. आधारकार्डसह इतर कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर अधिकाऱ्यांनाही समोरील बाजू बंद असल्याने मागच्या बाजूने कार्यालयात जावे लागत असल्याचे दिसून आले.

अवाढव्य पार्किंगमुळे वाहतूक केंडी

जिल्हाधिकारी कार्यालयाचे नूतनीकरणाचे काम करण्यात येत आहे. मंगळवारी कामात व्यत्यय येऊ नये,यासाठी गेट बंद करण्यात आले होते. यामुळे अधिकाऱ्यांसह सार्वजनिकांची वाहने रस्त्यावरच पार्क करण्यात आली होती. यामुळे रहदारीला अडथळा आल्यामुळे काही प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दुतर्फा चारचाकी वाहने पार्क करण्यात आल्याने रस्ता वाहतुकीसाठी अरुंद बनला होता. यामुळे मार्गक्रमण करताना वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागला.

कार्यालयाचे मुख्य गेट विकासकामांमुळे बंद करण्यात आले होते.मात्र याची कल्पना नसल्यामुळे अधिकारी व नागरिक नेहमीप्रमाणे आपल्या वाहनांनी येत होते. मात्र आवारात जाण्यासाठी मार्ग नसल्याने त्यांना रस्त्यावरच पार्किंग करावे लागत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात न्यायालय, विविध सरकारी कार्यालये असल्याने नागरिकांची नेहमीच याठिकाणी वर्दळ असते. कामानिमित्त दररोज हजारो नागरिक या परिसरात येत असतात. मात्र मंगळवारी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली.

मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात पेव्हर्स काढण्यासह विविध कामे हाती घेण्यात आली होती.यामुळे गेट बंद असल्याने बहुतांश वाहने रस्त्यावरच पार्क करण्यात आली होती. परिणामी रस्ता अरुंद बनल्याने वाहनांची ये-जा होणे मुश्कील बनले होते. तसेच काहीवेळा वाहतूक कोंडीही झाल्याचे दिसून आले. याठिकाणची वाहतूक कोंडी निकाली काढण्यासाठी पोलीस तैनात करण्यात न आल्याने वाहनधारकांना रहदारीस अडचण निर्माण झाली होती.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article