महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

जि.पं.सीईओंनी जाणून घेतल्या पीडीओंच्या समस्या

10:36 AM Feb 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी पंचायत विकास अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन समस्या जाणून घेतल्या. जिल्हा पंचायत कार्यालयामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरीय पंचायत विकास अधिकारी संघटनेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राहुल शिंदे यांनी विकास अधिकाऱ्यांकडून राबविण्यात आलेल्या सरकारच्या योजनांची माहिती जाणून घेतली. योजनांच्या अंमलबजावणीबाबतचा अहवाल जाणून घेतला. तसेच विकासकामे राबविताना निर्माण होणाऱ्या समस्यांचीही माहिती जाणून घेतली. विकास अधिकाऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे त्वरित निवारण करण्यात येईल, असे सांगितले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article