वेंगुर्ले परबवाडीतील डोंगर पायथ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न सोडवणार
जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांचे ग्रामस्थांना आश्वासन
वेंगुर्ले (वार्ताहर)-
वेंगुर्ले मठ सातेरी मंदिर कडे डोंगर भागातून जाणारा रस्ता खचला असल्याने परबवाडी येथील ४० घरांना अतिवृष्टीत धोका निर्माण झाला आहे. डोंगर भागातील रस्ता खचल्यामुळे रुग्णांना रुग्णालयाकडे नेताना डोलीचा आधार घेत पायपीट करत मुख्य रस्त्यापर्यंत न्यावे लागत आहे. या बाबत माहिती मिळताच जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी प्रशासनासह घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली आणि लवकरच रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे.मठ येथील ही गंभीर बाब लक्षात घेता मनीष दळवी यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यांच्यासोबत तहसिलदार ओंकार ओतारी, गटविकास अधिकारी दिनेश पाटकर, भाजप तालुका अध्यक्ष पप्पू परब उपस्थित होते. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी उपस्थित ग्रामस्थांना बरोबर चर्चा करून त्यांना उद्भवणाऱ्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. यावेळी सरपंच सौ रूपाली नाईक, अजित नाईक, विजय बोवलेकर, संतोष परब, सौरभ परब, दिगंबर परब, उत्तम परब, पोलीस पाटील सौ शमिका धुरी, पोलीस पाटील सौ अदिती परुळेकर, ग्रामसेवक विकास केळुसकर, कोतवाल सुरेश मटकर, ग्रामपंचायत कर्मचारी प्रकाश बोवलेकर, मठ तलाठी दिनेश गाभूळ आदि यावेळी उपस्थित होते.