महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

लोककल्प फाऊंडेशनतर्फे कणकुंबी शाळेत दफ्तर वाटप

11:19 AM Sep 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

फाऊंडेशनचा सामाजिक-शैक्षणिक उपक्रम

Advertisement

बेळगाव : लोकमान्य सोसायटीच्या लोककल्प फाऊंडेशनच्यावतीने सामाजिक व शैक्षणिक कार्यातून कणकुंबी येथील सरकारी प्राथमिक मुला-मुलींच्या शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांना दफ्तरांचे वाटप करण्यात आले. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. किरण ठाकुर यांच्या संकल्पनेतून लोकमान्य सोसायटीद्वारा लोककल्प फाऊंडेशन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबवित आहे. याच उपक्रमातून खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेण्यात आली आहेत. यामुळे अनेक लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध करून देण्यात आले आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना सौरदिवे, त्याचप्रमाणे बाकडे, वॉटर फिल्टर, शैक्षणिक साहित्य, खेळाचे साहित्य, गणवेश, सायकल व स्कूल बॅगचे वितरण करण्यात येत आहे. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुल्ला यांनी आभार मानले. विनय कोकितकर, संतोष कदम, विनायक मणगुतकर, पेडणेकर यासह इतर शिक्षक उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article