महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बबन भोबे मित्रमंडळातर्फे शाळकरी विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप

10:17 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : बबन भोबे मित्रमंडळाच्यावतीने शाळकरी मुलांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले. गोंधळी गल्ली येथील दत्त मंदिराजवळ शुक्रवारी सकाळी हा कार्यक्रम झाला. शाळा क्र. 22 च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्यात आले. बबन भोबे यांच्या हस्ते साहित्य वाटपाचा कार्यक्रम झाला. या उपक्रमासाठी डॉ. पी. वाय. हवालदार, शिरीष अध्यापक, डॉ. स्वप्ना मांजरेकर, महांतेश गुरुदार, संतोष पुरोहित यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमावेळी शंकर पावशे, विजू नांगले, सुहास शिंदे, दिलीप माने, सुरेश शिंदे, अमित किल्लेकर आदींसह विद्यार्थी व मुख्याध्यापक उपस्थित होते. शालेय साहित्यामुळे विद्यार्थी हर्षोल्हासित झाले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article