For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘शिवप्रतिष्ठान’च्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण

10:13 AM May 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
‘शिवप्रतिष्ठान’च्या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
Advertisement

उचगाव येथील कार्यक्रमात महाजन गुरुजींचे युवा पिढीला मार्गदर्शन : स्पर्धेत 70 विद्यार्थ्यांचा सहभाग

Advertisement

वार्ताहर /उचगाव

येथील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उचगाव शाखेच्यावतीने शिवकालीन युद्धकला व संरक्षण शिबिर, लाठी, भाला, रणवार, भारतीय व्यायाम, धारकरी व रणरागिणी यांना शिवचरित्रावर आधारित प्रश्नमंजुषा स्पर्धा मळेकरणी देवस्थान येथे इचलकरंजी येथील व भिडे गुऊजींसोबत सतत असणारे आणि ‘स्वच्छता दूत’ म्हणून ओळखले जाणारे महाजन गुऊजी यांच्या उपस्थितीत घेण्यात आल्या होत्या. या सपर्धेतील विजेत्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज चौक उचगाव येथे गुऊवार दि. 9 मे रोजी पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. प्रश्नमंजुषा स्पर्धेत 70 विद्यार्थी, विद्यार्थिनींनी भाग घेतला होता. यावेळी महाजन गुऊजी मार्गदर्शन करताना म्हणाले, आजचे युग धावपळीचे असून यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनींनी, युवकांनी योग्य तो मार्ग निवडून जीवनाची वाटचाल केली पाहिजे. कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता तसेच वाममार्गाला न लागता आपण एक चांगला मनुष्य बनण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन सर्वांनी वाटचाल करावी, असे आवाहन केले. यावेळी शिवप्रतिष्ठान उचगाव शाख प्रमुख नेहाल जाधव यांनी स्वागत केले. प्रश्नमंजुषा स्पर्धा पार पाडण्यासाठी मिथिल जाधव, यशवंत तरळे, गणपत देसाई, यशराज मण्णूरकर, साई पावशे, अथर्व जाधव, संदीप तरळे आदिंनी स्पर्धा पार पाडण्यासाठी सहकार्य केले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकरी यांच्या हस्ते विजेत्यांना ट्रॉफी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. स्पर्धेतील विजेते स्पर्धक मोठा गट : अनुक्रमे अंजली राजूकर, अश्विनी पावशे, अंकिता महेश कोळी. लहान गट: अऊणा सुनील तरळे, सलोनी लक्ष्मण चौगुले, भाग्यश्री मोहन लाळगे, उत्कृष्ट मनोगत: संध्या यल्लाप्पा कोवाडकर, भाग्यश्री मोहन लाळगे इत्यादी.

Advertisement

Advertisement
Tags :

.