For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विविध ठिकाणी महाप्रसादाचे वितरण

10:38 AM Sep 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
विविध ठिकाणी महाप्रसादाचे वितरण
Advertisement

सत्यनारायण पूजा-महाप्रसाद कार्यक्रमाचा शेकडो भाविकांनी घेतला लाभ : गणेश दर्शनासाठी भक्तांची अलोट गर्दी

Advertisement

बेळगाव : पाईपलाईन रोड, विजयनगर येथील मध्यवर्ती सार्वजनिक विघ्नहर्ता गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी मंडळाच्या 21 व्या वर्षानिमित्त सत्यनारायण पूजा आणि महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी अध्यक्ष राहुल उरणकर, उपाध्यक्ष रणजित पाटील यासह मंडळाचे कार्यकर्ते, नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी भक्तांनी बहुसंख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला.

कंग्राळ गल्ली

Advertisement

कंग्राळ गल्ली येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दुपारी 1 वाजता या महाप्रसादाला प्रारंभ झाला. महाप्रसादासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. साधारण 6 हजार भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी मंडळाचे कार्यकर्ते, भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदुनगर, राणा प्रताप रोड

हिंदुनगर राणा प्रताप रोड येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे रविवारी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी अनेक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. महाप्रसादासाठी भक्तांची गर्दी झाली होती.

विजयनगर पहिला क्रॉस

विजयनगर पहिला क्रॉस येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे सकाळी गणहोम,महापूजा आणि सायंकाळी महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी पाच हजाराहून अधिक भक्तांनी याचा लाभ घेतला. प्रसादासाठी भक्तांनी गर्दी केली होती.

जिल्हा अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून महाप्रसादाची पाहणी

जिल्हा अन्न सुरक्षा अधिकारी डॉ. जगदीश जिंगी यांनी रविवारी विविध ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या महाप्रसादाच्या ठिकाणी भेट देऊन अन्नाची पाहणी केली. स्वयंपाकात विविध अपायकारक कृत्रिम रंग आणि इतर घटक वापरले जात आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला हानी पोहचू लागली आहे. याची दखल घेत रविवारी विविध ठिकाणी डॉ. जगदीश जिंगी व यमनाप्पा यलिगार यांनी भेट देऊन स्वयंपाक करण्यात येणाऱ्या अन्नाची पाहणी केली.

Advertisement
Tags :

.