For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते महाप्रसाद व बक्षीस वितरण

04:11 PM Sep 08, 2025 IST | Radhika Patil
माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते महाप्रसाद व बक्षीस वितरण
Advertisement

दक्षिण सोलापूर :

Advertisement

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 26 मधील हेरिटेज फॉर्म येथे सालाबादप्रमाणे हेरिटेजचा राजा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या दिवशी महाप्रसाद वाटप तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ प्रभाग क्रमांक 26 च्या माजी नगरसेविका सौ. राजश्री चव्हाण यांच्या हस्ते पार पडला.

याप्रसंगी भाजपचे सामाजिक कार्यकर्ते अनिल चव्हाण यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर हेरिटेज भजनी मंडळाने भक्तिगीतांची उत्कृष्ट सादरीकरणे केली, त्यामुळे त्यांनाही बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.

Advertisement

हेरिटेज फॉर्मचे चेअरमन श्री. सुजित कोरे यांनी परिसरातील पाण्याची पाइपलाइन, अंतर्गत दिवाबत्ती आणि रस्त्याच्या समस्यांची माहिती माजी नगरसेविका राजश्री चव्हाण यांना दिली. त्यावर प्रतिक्रिया देताना सौ. चव्हाण यांनी सांगितले की, पाण्याच्या समस्येबाबत सोमवारी सोलापूर महानगरपालिकेच्या मुख्य कार्यालयाकडून सर्वे करून अंदाजपत्रक तयार करण्यासाठी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच अंतर्गत दिवाबत्तीबाबत झोन ५ च्या लाईट विभागाचे पवार यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून, सदरचे काम प्रगतीपथावर आहे. सोमवार किंवा मंगळवारी झोन अधिकारी हिबारे मॅडम यांच्याकडून स्थळ पाहणी करून अहवाल मुख्य कार्यालयात पाठवण्यात येणार आहे. त्यामुळे उपस्थित नागरिकांनी सौ. चव्हाण यांचे आभार मानले.

ओम गर्जना चौक येथील मारुती मंदिर ते हेरिटेज फॉर्मपर्यंतच्या रस्त्यासाठी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. लवकरच सदर रस्त्याचे काम सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

यावर प्रतिक्रिया देताना स्थानिक नागरिकांनी सांगितले की, "आम्ही गेली २०-२५ वर्षे या परिसरात राहतो. शंभर टक्के महापालिकेला कर भरतो, तरीही अपेक्षित विकास झालेला नाही. मात्र, पावसाळा सुरू होण्याआधी नगरसेविका सौ. चव्हाण यांना कळविल्यानंतर त्यांनी तातडीने हेरिटेज फॉर्मसमोरील रस्ता करून दिला. उर्वरित समस्या देखील दिवाळीपूर्वी मार्गी लावण्याचे त्यांनी ठोस आश्वासन दिले आहे. त्यामुळे आमच्या अनेक वर्षांच्या तक्रारींचा निचरा होणार आहे, अशी आम्हाला खात्री वाटते."

या कार्यक्रमास चेअरमन सुजित कोरे, महारुद्र खुरपे, ब्रह्मदेव थिटे, रवी कोटगी, विशाल खाडे, अमोल गोतसुर्वे, सागर माळी, राम सुरवसे, सोमनाथ स्वामी, विठ्ठल लहाने, वैभव ठोकळ, किरण क्षीरसागर, गजानन साठे, आशिष बिराजदार, विजय म्हमाणे, सूर्यकांत चौधरी, रवी मस्के, तसेच महिलांमधून शुक्ला साठे, सुचिता थिटे, अर्चना खुरपे, अंजली क्षीरसागर, मनीषा बिराजदार, ज्योती माळी, विजयश्री माशाळ, भाग्यश्री चौधरी, विद्या लहाने, रूपाली शिंदे, अश्विनी कोटगी, वायकर मॅडम व इतर असंख्य महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Advertisement
Tags :

.