For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डॉ. किरण ठाकुर कृतज्ञता सोहळ्यात लोकगौरव पुरस्कारांचे वितरण

10:47 AM Apr 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
डॉ  किरण ठाकुर कृतज्ञता सोहळ्यात लोकगौरव पुरस्कारांचे वितरण
Advertisement

लोकमान्य सोसायटी, पुणे विभागातर्फे शानदार कार्यक्रमात सन्मानित

Advertisement

पुणे : लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष तथा तरुण भारतचे समूह प्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांच्या जन्मदिनानिमित्ताने कृतज्ञता सोहळ रविवार दि. 7 एप्रिल रोजी पुणे येथे उत्साहात पार पडला. यावेळी पुणे महानगरातील विविध समाज घटकांतील मान्यवर, सोसायटीचे सभासद, ग्राहक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या सोहळ्यात विविध क्षेत्रातील साठहून अधिक मान्यवरांचा लोकगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. सोहळ्याच्या सुरुवातीला ज्येष्ठ संस्कृत तज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांच्या नेतृत्वात वैदिक मंत्रोच्चारात जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर पुणे शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा लोकगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. शाल, लामणदिवा व रोप असे या पुरस्काराचे स्वरुप होते. या वेळी लोकमान्य सोसायटीतील महिला कर्मचाऱ्यांकडून डॉ. ठाकुर यांचे औक्षण करण्यात आले.

म्हात्रे पूल डी. पी. रोडवरील पंडित फार्म येथे सायंकाळी 5 ते 10 या वेळात झालेल्या या सोहळ्यात खासदार मेधा कुलकर्णी, आमदार माधुरीताई मिसाळ, आमदार रवींद्र धंगेकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, राजेश पांडे, माधव भंडारी, अंकुश काकडे, बाबा धुमाळ, दिलीप वेडे पाटील, कुलदीप सावळेकर, मनीष साबडे, पद्मश्री विजय घाटे, उदय लागू, लोकमान्य सोसायटीचे उपाध्यक्ष अजित गरगट्टी, संचालक पंढरी परब, सुबोध गावडे, विठ्ठल प्रभू, डॉ. दामोदर वागळे, श्रीमती गायत्री काकतकर व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सहभागी होत डॉ. ठाकुर यांना शुभेच्छा दिल्या. लोकगौरव पुरस्कारार्थींमध्ये सामाजिक क्षेत्रातील अग्निशमन दलातील पहिल्या फायर फायटर मेघना सकपाळ, सेवा मित्र मंडळ नामक गणपती मंडळाचे शिरीष मोहिते, माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर, जनसेवा फाऊंडेशनचे डॉ. विनोद शहा, येरवडास्थित सुराज्य प्रकल्पाचे संचालक विजय शिवले, पुण्यभूषण फाऊंडेशनचे डॉ. सतीश देसाई, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल भटेवरा, रक्तदान चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते राम बांगड, रूरल रिलेशन्सचे प्रदीप लोखंडे, सीए राज देशमुख आदींचा समावेश होता.

Advertisement

पत्रकारिता क्षेत्रातील पत्रकार मुपुंद संगोराम, विजय बावीस्कर, सम्राट फडणीस, आनंद अग्रवाल, सिद्धार्थ केळकर, अजय कांबळे, आनंद गांधी यांच्यातर्फे बी. एल. स्वामी यांनी सत्कार स्वीकारला.  शैक्षणिक क्षेत्रातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या उपसचिव डॉ. निवेदिता एकबोटे, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे चंद्रकांत शहासने, नॅशनल बुक ट्रस्टचे उपाध्यक्ष राजेश पांडे, मेंदू तज्ञ डॉ. श्रुती पानसे, व्यवसाय मार्गदर्शक व प्रशिक्षक चकोर गांधी, अमेझॉन प्राईमचे इंडिया आणि दक्षिण आशियाई देशांसाठी हेड ऑफ व्हिज्युअल इफेक्ट्स चेतन देशमुख हे पुरस्कारार्थी होते. सहकार क्षेत्रातील सहकार तज्ञ विद्याधर अनास्कर, पुणे जिल्हा सोसायटी फेडरेशन व राज्य फेडरेशन यांचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष देशपांडे, ग्राहक पेठेचे संचालक सूर्यकांत पाठक, मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश वाबळे हे उपस्थित होते.

प्रशासनातील महाराष्ट्र विद्युत महामंडळाच्या पुणे परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार, पुणे महानगरपालिकेचे मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे, उपसंचालक भूमीअभिलेख अनिल माने, पोलीस विभागातील एनआयए शोध घेत असलेल्या दहशतवाद्यांना पकडून दिलेले कोथरूडमधील पोलीस ज्ञानेश्वर पांचाळ, बाळारफी शेख तर सांस्कृतिक क्षेत्रातील ज्येष्ठ निवेदक व सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ, ज्येष्ठ व्हायोलिन वादक पं. अतुलकुमार उपाध्ये, ज्येष्ठ साहित्यिका अरुणाताई ढेरे, चित्रकार शेखर साने, क्रीडा समीक्षक सुनंदन लेले, नाट्याकर्मी समीर हम्पी, ‘सा व नी‘चे सुरेंद्र मोहिते आदींनी पुरस्कार स्वीकारला. उद्योग क्षेत्रातून पीएनजीचे अजित काका गाडगीळ, क्रिश्ना डायग्नोस्टिक्सच्या व्यवस्थापकीय संचालिका पल्लवी जैन, ज्येष्ठ आर्किटेक्ट महेश नामपूरकर, कृषीनाथ अॅग्रो लिमिटेडचे महेशराव करपे, स्टार्टअप-उद्योजक क्षेत्रातील पॅडकेअरचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य धारिया, इको बायोट्रॅपचे सीईओ प्रसाद फडके, मेधा ताडपत्रीकर तर संरक्षण क्षेत्रातील ब्रिगेडियर रणजित मिश्रा, कर्नल संभाजी पाटील आदी मान्यवरांचा समावेश होता. दरम्यान, या सोहळ्यात उपस्थितांसाठी विशेष मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजनदेखील करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशील जाधव यांनी केले.

Advertisement
Tags :

.