इन्सुलीत शिक्षणमंत्र्यांच्या माध्यमातून गृहपयोगी वस्तूंचे वाटप
प्रतिनिधी
बांदा
गणेश चतुर्थी हा कोकणातील प्रमुख सण आहे. हा सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो .गेली अनेक वर्षे या मतदारसंघाचे आमदार तथा शिक्षणमंत्री दीपक केसरकर गणेश चतुर्थीचे औचित्य साधून गृहोपयोगी सामान देतात. याही वर्षी त्यांनी संपूर्ण मतदारसंघात हे काम सुरू ठेवले आहे. असे प्रतिपादन शिवसेना तालुकाप्रमुख नारायण ऊर्फ बबन राणे यांनी इन्सुली येथे केले.इन्सुली गावठण रमाईनगर येथे नुकताच कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून धान्य वाटप कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते यावेळी शाखा प्रमुख प्रशांत धुरी, उपविभाग प्रमुख काका चराटकर, शाखाप्रमुख अभय राणे, दीपक जाधव, गोट्या सांगेलकर, अरविंद जाधव आदी उपस्थित होते. यावेळी राणे बोलत होते.यावेळी दीडशेहुन अधिक जणांना गृहपयोगी वस्तू वाटप करण्यात आल्या. यावेळीं उपस्थित ग्रामस्थांनी मंत्री दीपक केसरकर यांचे आभार मानले असून गेली कित्येक वर्षे ते आम्हाला या सणात भेट वस्तू देतात असे उदगार काढले.