महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साळ येथे शेतकऱ्यांना मोफत खत, बियाणांचे वाटप

12:36 PM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शिक्षा व्हिजन डिचोलीचा उपक्रम, कृषीमित्र आठवड्यातून किमान पाच दिवस सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार : आमदार शेट्यो

Advertisement

वार्ताहर /लाटंबार्से

Advertisement

गोवा राज्याच्या कृषी खात्याच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे. शिक्षा व्हिजन-डिचोली आज शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिली आहे. तसेच शेतकऱ्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवण्यासाठी आज शिक्षा व्हिजनतर्फे एक प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार साळ येथे कृषीमित्र आठवड्यातून फक्त एकच दिवस न येता आठवड्यातील किमान पाच दिवस सेवा देण्यासाठी प्रयत्न करणार असे विचार शिक्षा व्हिजनचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी मांडले. शिक्षा व्हिजन तर्फे साळ येथे मोफत खत व बियाणे वाटप केले. त्यावेळी ते बोलत होते.शिक्षा व्हिजन हे विद्यार्थ्यांच्या विविध अडचणी सोडविण्यास व विद्यार्थ्यांना शिक्षणाद्वारे प्रगतीपथावर नेण्यासाठी विविध योजना आखून अंमलात आणीत आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपत आहे. समाजातील अनेक घटकांना विविध प्रकारचे पाठबळ देऊन त्यांचे पाठीराखे बनत आहे. आज आम्ही कृषी क्षेत्रातही त्यांच्या पाठीमागे उभे राहण्यासाठी हा उपक्रम राबवित आहे, असे डॉ. शेट्यो यांनी सांगितले.

यावेळी अभियंते रवळू शेट्यो, शिक्षा व्हिजन मंडळाचे सचिव प्राध्यापक दिलीप धारगळकर, जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर, डिचोली भाजपा गटाध्यक्ष विश्वास गावकर, जनरल सेव्रेटरी डॉ. कौस्तुभ पाटणेकर, किसान मोर्चा डिचोली अध्यक्ष विठ्ठल करमळकर, कृषी अधिकारी डेरीक आफान्सो, साळ ग्रामपंचायतीचे पंच विशाल परब, पंच वैष्णवी परब, माजी जिल्हा पंचायत सदस्य संजय शेट्यो, शांबा घुरे, कालिदास राऊत, वसंत राउत, शिवराम देसाई, गोपी राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी शिक्षा व्हिजन-डिचोली मार्फत राबविलेल्या अनेक उपक्रम व त्याचे महत्त्व याबद्दल व कृषी प्रधान गावातील शेतकऱ्यांबाबत प्राध्यापक दिलीप धारगळकर यांनी विचार मांडले. तसेच जिल्हा पंचायत सदस्य प्रदीप रेवोडकर यांनीही आपले विचार मांडले. यावेळी साळ येथील 325 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना मोफत खत व बियाणंचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. आभार दिलीप धारगळकर यांनी मानले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article