For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगेलीत विशाल परबांच्या नेतृत्वात शैक्षणिक साहित्य वाटप

05:41 PM Jun 28, 2024 IST | अनुजा कुडतरकर
सांगेलीत विशाल परबांच्या नेतृत्वात शैक्षणिक साहित्य वाटप
Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी

Advertisement

कोकणातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, त्यांना उच्च शिक्षणासाठी विविध दालने उघडावी यासाठी भारतीय जनता पार्टी कोकणात सातत्याने उपक्रमशील आहे. खासदार नारायण राणे आणि राज्याचे बांधकाममंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शाळांना शैक्षणिक साहित्याचे वाटप व त्यांना मदत अभियान भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून राबविण्यात येणार आहे असे भाजप प्रदेश युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांनी स्पष्ट केले . सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील जि.प. पूर्व प्राथमिक केंद्रशाळा सांगेली नंबर १ मध्ये भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचा शुभारंभ मुलांना मोफत दप्तर आणि शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना श्री विशाल परब म्हणाले की भारतीय जनता पार्टी ही कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सज्ज असून भारताचे उद्याचे भविष्य असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना कला, क्रीडा, आरोग्य आदी क्षेत्रात सक्षम बनवण्यासाठी भाजपा सर्वतोपरी मदत करणार आहे. कोकणचे नेते  नारायण राणे आणि रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली त्यासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम राबवण्यात येत असून त्याची जबाबदारी मी मनापासून स्वीकारली आहे. यापुढेही अशा पद्धतीने गरजवंत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत केली जाणार असून त्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्नशील राहणार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.