For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यातील मराठी शाळांत युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण

10:44 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यातील मराठी शाळांत युवा समितीतर्फे शैक्षणिक साहित्याचे वितरण
Advertisement

मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहनाची गरज : म. ए. समिती युवा समितीच्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह

Advertisement

वार्ताहर /किणये

तालुक्यातील प्राथमिक मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी म. ए. युवा समितीच्या माध्यमातून पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात येत आहे. हा उपक्रम गेल्या चार पाच वर्षापासून राबविण्यात येत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे, तसेच मराठी सरकारी शाळा टिकविण्यासाठी पालक वर्ग व शिक्षणप्रेमी नागरिकांतून जनजागृती व्हायला पाहिजे, असे मनोगत म. ए. युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी मच्छे येथे व्यक्त केले.

Advertisement

मच्छे येथील सरकारी प्राथमिक मॉडेल मराठी शाळा

मच्छे येथील ग्राम पंचायतीजवळील सरकारी प्राथमिक मॉडेल मराठी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी केसरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष सुधीर हावळ होते. सागर कणबरकर, राजू कदम, श्रीकांत कदम, केदारी करडी, गजानन छप्रे, साईनाथ शिरोडकर आदींच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रभारी मुख्याध्यापक के. के. बेळगावकर, मोहन उसुलकर, जतिन मंडोळकर व शिक्षक वर्ग उपस्थित होते. लक्ष्मीनगर मच्छे येथील मराठी शाळेतही पहिलीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी शांताराम पाटील हे होते. मुख्याध्यापक बसवराज रेमाणी यांनी प्रास्ताविक केले. सुनिल चौगुले व शिक्षक एसडीएमसी कमिटीचे सदस्य उपस्थित होते.

वाघवडे येथील प्राथमिक मराठी शाळा

वाघवडे येथील प्राथमिक मराठी शाळेत विद्यार्थ्यांना म. ए. युवा समितीचे शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी एपीएमसी सदस्य आर. के. पाटील हे होते. युवा समितीने ग्रामीण भागातील मराठी शाळांसाठी हा चांगला उपक्रम राबविला आहे, असे पाटील यांनी म्हटले. यावेळी नागेंद्र पाटील, एम. पी. आंबोळकर, नागनाथ बुवाजी, जोतिबा आंबोळकर, बंडू गुरव आदींच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. योगेश पाटील, सुरज काकतकर, नागेशी आंबोळकर आदींसह एसडीएमसी कमिटी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.

संतिबस्तवाड येथील प्राथमिक मराठी केंद्र शाळा

संतिबस्तवाड येथील प्राथमिक मराठी केंद्र शाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य देण्यात आले. प्रभारी मुख्याध्यापिका रेखा चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. यावेळी योगेश पाटील व इतरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी एस. व्ही. नायक, एस. टी. पोवार, एस. जे. गुंडोजी आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.