For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाडलोस शाळेत विद्यार्थ्यांना अधिवास दाखले वाटप

04:12 PM Sep 18, 2025 IST | अनुजा कुडतरकर
पाडलोस शाळेत विद्यार्थ्यांना अधिवास दाखले वाटप
Advertisement

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम

Advertisement

न्हावेली / वार्ताहर
जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाडलोस नं.१ येथील विद्यार्थ्यांना अधिवास दाखले वाटप करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे मिळविण्यात सुलभता मिळाली असून पालक वर्गातून समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजेश पेडणेकर,ग्रामसेवक प्रतिभा आळवे, तलाठी सुप्रिया शेळके, सीआरपी नेहा नाईक,कृषी सहायक वैभव ननवरे,मुख्याध्यापक विजय गावडे,उपशिक्षक अनिल वरक,पालक,प्रतिनिधी मंगेश पेडणेकर,ग्रामपंचायत कर्मचारी आकाश गावडे व दिक्षा कुबल यांच्या उपस्थितीत दाखले वाटप झाले.मुख्याध्यापक विजय गावडे यांनी विद्यार्थ्यांना दाखल्यांचे महत्व पटवून दिले.कमी कालावधीत दाखले उपलब्ध करून दिल्याबद्दल सीएसइ सेंटर प्रमुख सोनाली सातार्डेकर यांचे विशेष आभार मानण्यात आले.या उपक्रमामुळे शासनाचे प्रशासन जनतेच्या दारी पोहोचविण्याचे उद्दिष्ट अधिक प्रभावीपणे साध्य झाले असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.विद्यार्थ्यांना अधिवास दाखले मिळाल्याने शैक्षणिक प्रक्रियेत मोठी सोय झाली असून पालकांचा भार हलका झाला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.