महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पंतप्रधानांकडून 1 लाख नियुक्तीपत्रांचे वाटप

06:21 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक केल्याचा दावा

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी रोजगार मेळाव्यातच्या अंतर्गत 1 लाखाहून अधिक जणांना नियुक्तीपत्रे प्रदान केली आहेत. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचा हा 12 आणि अखेरचा रोजगार मेळावा होता. याचबरोबर पंतप्रधानांनी दिल्लीत कर्मयोगी भवनाच्या कामाचा शुभारंभ केला आहे.

कठोर मेहनत घेतली तर स्वत:साठी स्थान निर्माण करता येऊ शकते हे प्रत्येक युवा जाणून आहे. 2014 पासून आम्ही युवांना विकासात भागीदार करण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही मागील सरकारच्या तुलनेत 1.5 टक्के अधिक नोकऱ्या प्रदान केल्याचा दावा मोदींनी केला आहे.

पूर्वी नोकरीसाठी जाहिरात प्रकाशित होण्यापासून नियुक्ती पत्र प्रदान करेपर्यंत मोठा कालावधी लागत होता. या विलंबाचा लाभ घेत लाचेचा खेळ मोठ्या प्रमाणात व्हायचा. परंतु आम्ही भारत सरकारमध्ये भरती प्रक्रियेला आता पूर्णपणे पारदर्शक केले असल्याचे मोदींनी म्हटले आहे.

स्टार्टअप्सची संख्या 1.25 लाखाच्या आसपास

भारत आता जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टीम आहे. देशात स्टार्टअप्सची संख्या आता 1.25 लाखाच्या आसपास पोहोचत आहे. यातही मोठ्या संख्येत स्टार्टअप टीयर 2 आणि टीयर 3 शहरांमध्ये आहेत. या स्टार्टअप्सद्वारे युवांसाठी लाखो रोजगार निर्माण होत आहेत. यावेळच्या अर्थसंकल्पात स्टार्टअपला मिळणारी करसवलत वाढविण्याची घोषणा करण्यात आल्याचे मोदी म्हणाले.

उत्तम संपर्कव्यवस्था

या रोजगार मेळाव्याद्वारे भारतीय रेल्वेमध्येही नियुक्त्या होत आहेत. भारतीय रेल्वे आता एका मोठ्या स्थितंतराला सामोरी जात आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत भारतीय रेल्वेचा पूर्णपणे कायापालट होणार आहे. देशात संपर्कव्यवस्थेचा विस्तार झाल्यावर त्याचा प्रभाव एकाचवेळी अनेक गोष्टींवर पडतो. कनेक्टिव्हिटी सुधारल्याने नव्या बाजारपेठा निर्माण होऊ लागतात, पर्यटनस्थळांचा विकास होतो. नवे उद्योग तयार होतात आणि यातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात, असे उद्गार मोदींनी काढले आहेत.

कर्मयोगी भारत पोर्टलवर कोर्स उपलब्ध

दिल्लीत आज एका इंटीग्रेटेड ट्रेनिंग कॉम्प्लेक्सचे भूमिपूजन झाले. नव्या ट्रेनिंग कॉम्प्लेक्समुळे क्षमतावृद्धीच्या आमच्या पुढाकाराला आणखी मजबुती मिळेल असा विश्वास आहे. सरकारने कर्मयोगी भारत पोर्टल सादर केले असून त्यावर विविध विषयांशी निगडित 800 हून अधिक कोर्स उपलब्ध आहेत. आतापर्यंत या पोर्टलशी 30 लाखाहून अधिक युजर्स जोडले गेले असल्याचे मोदींनी सांगितले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article