महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

इकडे नोकरीतून बरखास्त, तिकडे काँग्रेसची उमेदवारी

05:02 AM Nov 13, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काही दिवसांपूर्वीपर्यंत महसूल निरीक्षक (आरआय) म्हणून कार्यरत असलेले राहुल सिंह हे काँग्रेस पक्षाचे उमेदवार ठरले आहेत. मागील महिन्यातच राहुल सिंह यांना नोकरीतून बरखास्त करण्यात आले होते. मध्यप्रदेशातील विरोधी पक्षनेते डॉक्टर गोविंद सिंह यांचे भाचे असलेले राहुल सिंह हे नोकरीतून बरखास्त झाल्यावर त्वरित काँग्रेसच्या तिकिटावर मेहगाव मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत. राहुल सिंह भदौरिया हे मागील महिन्यापर्यंत आरआय म्हणून मुरैना जिल्ह्dयात कार्यरत होते. परंतु राजकारणातील त्यांचा रस कायम होता. राहुल सिंह यांचे मामा डॉक्टर गोविंद सिंह हे लहार मतदारसंघातून सलग सातवेळा निवडून आले असून सध्या विरोधी पक्षनेते आहेत. स्वत:च्या मामांकडे पाहून राजकारणात उतरण्याची इच्छा राहुल सिंह यांनाही होती, परंतु शासकीय सेवेत असताना हे करणे शक्य नव्हते. स्वत:च्या मामांच्या माध्यमातून काँग्रेसची उमेदवारी मिळविण्याचे प्रयत्न राहुल सिंह यांनी सुरू केले होते, स्वत:ची उमेदवारी निश्चित असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी महसूल निरीक्षक पदाचा राजीनामा दिला होता. परंतु उमेदवारी जाहीर होण्याची वेळ तोंडावर आली असतानाही त्यांचा राजीनामा मंजूर झाला नव्हता.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article