प्रभाससोबत पुन्हा झळकणार दिशा
फौजी चित्रपटात वर्णी लागणार
पॅन इंडिया स्टार प्रभास सध्या स्वत:च्या अनेक आगामी चित्रपटांवरून चर्चेत आहे. याचदरम्यान त्याचा आणखी एक चित्रपट ‘फौजी’वरून नवी माहिती समोर आली आहे. या चित्रपटात प्रभासची जोडी एका अभिनेत्रीसोबत जमणार आहे.
फौजी हा एक अॅक्शन ड्रामापट असेल. फौजी चित्रपटात प्रभास आणि दिशा पाटनी एकत्र दिसून येऊ शकतात. या चित्रपटापूर्वी प्रभास आणि दिशाच्या जोडीला ‘कल्कि 2898 एडी’मध्ये पाहिले गेले होते. नव्या चित्रपटाचे अधिकृत नाव अद्याप निश्चित झालेले नाही, परंतु तोपर्यंत फौजी असा नामोल्लेख केला जाणार आहे.
या चित्रपटात दोन अभिनेत्री असणार आहेत. यात इमानवी इस्माइलचे नाव यापूर्वीच निश्चित झाले आहे. तर दुसरी मुख्य अभिनेत्री म्हणून दिशा पाटनीचे नाव सामील झाले आहे. निर्मात्यांकडून अद्याप कलाकारांसंबंधी कुठलीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
फौजी सोबत प्रभास हा स्पिरिट, द राजा साब यासह अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसून येणार आहे. स्पिरिट या चित्रपटाचे दिग्दर्शन संदीप रे•ाr वांगा करत आहे. या चित्रपटात प्रभास एका पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर द राजा साब हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे.