For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

काँग्रेस कार्यकारिणीत आगामी निवडणुकांवर चर्चा

07:00 AM Dec 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
काँग्रेस कार्यकारिणीत आगामी निवडणुकांवर चर्चा
Advertisement

बैठकीनंतर के. सी. वेणुगोपाल यांची माहिती

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

कोणताही विलंब न करता आगामी निवडणुकांसाठी काँग्रेस सज्ज होत असल्याची माहिती गुरुवारी पक्षाचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली. पक्षाचे नेते आता निवडणूक मोडमध्ये असून या महिन्यातच छाननी समितीच्या स्थापनेसह लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार लवकरच निश्चित केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. पक्ष मुख्यालयात गुरुवारी चार तास चाललेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. पक्ष कार्यकारिणीच्या सदस्यांनी राहुल गांधींना भारत जोडो यात्रा 2.0 काढण्याची विनंती केली असून यासंदर्भात लवकरच निर्णय घेतला जाईल. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा समिती एक-दोन दिवसांत जाहीर केली जाईल, असेही वेणुगोपाल म्हणाले. काँग्रेसच्या सर्वोच्च निर्णय मंडळाच्या बैठकीला पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. बैठकीत मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीवरही पक्षाच्या उच्चपदस्थांनी चर्चा केली. या राज्यांतील निवडणुकीसंबंधी प्रभारींनी कामगिरीबाबत स्पष्टीकरण दिल्याचे वेणुगोपाल म्हणाले. तसेच संसदेतील निलंबन कारवाईबाबत चर्चा करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

राहुल गांधींची जानेवारीत भारत जोडो यात्रा

काँग्रेस नेते राहुल गांधी जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून भारत जोडो यात्रा भाग-2 सुरू करणार आहेत. या मोहिमेंतर्गत राहुल गांधी अऊणाचल ते गुजरात हा प्रवास करणार आहेत. गुऊवारी सीडब्ल्यूसी बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भारत जोडो यात्रा भाग 2 चा उल्लेख केला. आणखी एक महत्त्वाची बाब कार्यसमितीसमोर ठेवायची आहे, असे खर्गे म्हणाले. गेल्या अनेक महिन्यांपासून पक्षाचे सर्व नेते आणि कार्यकर्ते एकमताने माझ्यासमोर सातत्याने भारत जोडो यात्रेबाबत विचारणा करत असल्याचेही त्यांनी उपस्थितांना सांगितले.

Advertisement
Tags :

.