महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राजस्थान अन् तेलंगणात युपी मॉडेलची चर्चा

05:41 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपकडून प्रचारात योगी मॉडेलचा उल्लेख

Advertisement

राजस्थान आणि तेलंगणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजप उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या युपी मॉडेलचा मुद्दा प्रकर्षाने जनतेसमोर मांडत आहे. राजस्थानमध्ये तर योगी मॉडेल स्वीकारणार असल्याचे भाजपने जाहीर केले आहे. तर दुसरीकडे तेलंगणात देखील केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी राज्यात सत्तेवर आल्यास कायदा सुव्यवस्था सुधारण्यासाठी उत्तरप्रदेशच्या धर्तीवर बुलडोझर चालविण्याचे आश्वासन दिले आहे. तेलंगणात भाजप आता युपी मॉडेलच्या नावावर मते मागत आहे.

Advertisement

राजस्थानात योगी मॉडेल

राजस्थानात निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा समोर करून लढली जात असली तरीही पक्षाची रणनीति युपी मॉडेलची आहे. राजस्थानच्या घोषणापत्रात अँटी रोमियो स्क्वॉड निर्माण करण्याचे आश्वासन आहे. तसेच खासदार योगी बालकनाथ यांना विधानसभेची उमेदवारी देऊन त्यांना मुख्यमंत्री करण्याची चर्चा जोर पकडू लागली आहे. बाबा बालकनाथ देखील गोरखनाथ संप्रदायाचेच योगी आहेत. योगी आदित्यनाथ त्यांच्या प्रचारासाठी देखील पोहोचले होते. कन्हैयालाल यांची हत्या उत्तरप्रदेशात झाली असती तर आरोपींना कशाप्रकारे धडा शिकविला गेला असता हे लोक जाणून आहेत असे योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेत म्हटले होते. तर पंतप्रधान मोदींनी देखील स्वत:च्या प्रचारसभेत कन्हैयालाल यांच्या हत्येसाठी राजस्थानातील काँग्रेस सरकारलाच जबाबदार ठरविले होते. राज्यात योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभांचा धडाका लावला असून सभांमध्ये इस्रायलचा मुद्दा उपस्थित करून वातावरण चांगलेच तापविले आहे.

तेलंगणाही योगीमय

तेलंगणात भाजप सत्तेवर आल्यास गुन्हेगारांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. तेलंगणातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी युपी मॉडेल लागू करण्यात येईल. राज्यातील गरीब मुस्लिमांच्या जमिनींवर अवैध कब्जा करत व्यावसायिक कॉम्प्लेक्स आणि मॅरेज हॉल तयार करण्यात आले आहेत. याचमुळे भाजप सत्तेवर आल्यास तेलंगणातही बुलडोझर चालविला जाणार असल्याची घोषणा केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डीयांनी केली आहे. तेलंगणातील बहुचर्चित आमदार टी. राजा सिंह देखील स्वत:च्या भाषणात योगी मॉडेलची चर्चा करतात.

चुरशीच्या लढतीतयोगी मॉडेल निर्णायक

राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड असो किंवा तेलंगणा या सर्व राज्यांमध्ये यंदा चुरशीची लढत दिसून येत आहे. कुठल्याही एका पक्षाच्या बाजूने वातावरण दिसून येत नसल्याचे मानले जाते. काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांनी जवळपास एकसारख्या योजनांची घोषणा केली आहे. महिला, बेरोजगार, विद्यार्थ्यांसाठी दोन्ही बाजूंकडून आश्वासनांचा वर्षाव झाला आहे. परंतु या आश्वासनांच्या व्यतिरिक्त लोकांना स्वत:च्या बाजूने वळविण्यासाठी भाजपला योगी मॉडेल उपयुक्त ठरणार आहे. कायदा-सुव्यवस्थेवरून पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या सर्व राज्यांमधील लोक योगी मॉडेलचा उल्लेख करत असतात.

देशभरात योगी मॉडेलची चर्चा

योगी मॉडेलची चर्चा केवळ भाजपशासित राज्यांमध्येच होतेय असे नाही. सिद्धू मूसेवालाच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी पंजाबमध्ये योगी सरकार असते तर माझ्या पुत्राचे मारेकरी मोकाट फिरू शकले नसते, असे म्हटले होते. तर बिहार आणि हरियाणाच्या मंत्री आणि आमदारांनी उघडपणे राज्यात योगींच्या बुलडोझर धोरणाचे समर्थन केले आहे. आरोपींचे नावे आणि छायाचित्रे चौकात झळकविणे, दंगलीत शासकीय संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांकडून भरपाई वसूल करण्याची पद्धत अनेक राज्यांमध्ये लागू करण्याची मागणी झाली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article