ब्रह्मांडात पृथ्वीसारख्या अनेक ग्रहांचा शोध
पाण्याच्या अस्तित्वाबद्दल मोठा दावा
वैज्ञानिकांनी ब्रह्मांडात पृथ्वीसारख्या अनेक सृष्टी शोधल्या आहेत. हे ग्रह दूर अंतरावरील ताऱ्यांभवती फिरत असतात. परंतु त्यांचा आकार, रचना आणि जीवनासाठी उपयुक्त स्थिती आमच्या पृथ्वीशी मिळतीजुळती आहे. नासाच्या केपलर स्पेस टेलिस्कोपने यातील अनेकांचा शोध लावला आहे. हे ग्रह हॅबिटेबल झोनमध्ये असून तेथे पाणी तरल रुपात असू शकते.
एक्सोप्लॅनेट्स म्हणजे काय?
एक्सोप्लॅन्ट्ट्स असे ग्रह आहेत, जे आमच्या सौरमंडळाबाहेर आहेत. वैज्ञानिक त्यांना दुर्बिणींनी शोधतात. ताऱ्यांसमोरून गेल्यावर प्रकाश कमी झाल्याने या ग्रहांचा शोध लागतो. पृथ्वीसारखी स्थितीचा अर्थ हे आकारात छोटे, खडकाळ आणि स्वत:च्या ताऱ्यापासून योग्य अंतरावर आहेत, जेणेकरून अधिक उष्णता आणि अधिक थंडीही नाही. याला गोल्डीलॉक्स झोन असेही म्हटले जाते.
आतापर्यंत हजारो एक्साप्लॅनेट्स मिळाले असून परंतु पृथ्वीसारखे काही मोजकेच आहेत. ब्रह्मांडात केवळ पृथ्वीवर जीवसृष्टी आहे का असा प्रश्न उपस्थित यामुळे होतो. जीवनाचे संकेत शोधण्यासाठी जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप याच्या वायुमंडळावर संशोधन करत आहेत. तेथे ऑक्सिजन किंवा मिथेन सारखे वायू आढळल्यास जीवसृष्टीचा सुगावा लागू शकतो.
केपलर स्पेस टेलिस्कोप : शोधाचा तारा
नासाच्या केपलर टेलिस्कोपने 2009-18 पर्यंत काम केले आणि त्याने 2600 हून अधिक ग्रह शोधले आहेत. यातील अनेक पृथ्वीसारखे आहेत. आता टेस टेलिस्कोपही मदत करत आहे.
1 केपलर-69सी
शोध : 2013 मध्ये केपलरने शोधले
आकार : पृथ्वीपेक्षा काही मोठा (सुपर-अर्थ), परंतु व्हिनससारखा तप्त
फिरणे : स्वत:च्या ताऱ्याभोवती 242 दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा
अंतर : ताऱ्यापासून 0.64 एयू (पृथ्वी-सूर्याच्या अंतराच्या 64 टक्के)
जीवसृष्टीची शक्यता : पूर्वी वास्तव्ययोग्य वाटत होते, परंतु आता आता अत्यंत तप्त वाटतोय, व्हिनससारखा.
2 केपलर-452बी
शोध : 2015 साली
आकार : पृथ्वीपेक्षा 1.6 पट मोठा
फिरणे : 385 दिवसांमध्ये एक प्रदक्षिणा, आमच्या एक वर्षाप्रमाणे
अंतर : ताऱ्यापासून 1.05 एयू, सूर्यासारखा तारा
जीवनाची शक्यता : सर्वाधिक पृथ्वीसारखी, उष्णता योग्य, पाणी असू शकते, याला कझिन म्हटले जाते, परंतु अधिक अवजड गुरुत्वाकर्षण
3 केपलर-186एफ
शोध : 2014 साली
आकार : पृथ्वीइतका (1.1 पट व्यास)
फिरणे : 130 दिवसात प्रदक्षिणा
अंतर : ताऱ्यापासून 0.4 एयू अंतर लाल रंगाचा ग्रह
जीवनाची शक्यता : पहिला पृथ्वीच्या आकाराचा ग्रह हॅबिटेबल झोनमध्ये, खडकाळ जमीन आणि समुद्र असण्याची शक्यता
4 केपलर-438बी
शोध : 2015 साली
आकार : पृथ्वीपेक्षा 1.1 पट
फिरणे : 35 दिवसात प्रदक्षिणा
अंतर : ताऱ्यापासून 0.1 एयू, लाल तारा
जीवनाची शक्यता : प्रथम अनुकूल वाटत होता, परंतु ताऱ्याच्या फ्लेयर्समुळे वायुमंडळ नष्ट होऊ शकते, आता कमी शक्यता
5 ट्रॅपिस्ट-1ई
शोध : 2017 साली
आकार : पृथ्वीइतका (0.92 पट व्यास)
फिरणे : 6.1 दिवसात प्रदक्षिणा
अंतर : ताऱ्यापासून 0.029 एयू, सात ग्रहांची सिस्टीम
जीवनाची शक्यता : थंड तारा, परंतु योग्य झोनमध्ये, पाणी अन् वायुमंडळ असू शकते.
6 केपलर-1649सी
शोध : 2020 साली
आकार : पृथ्वीपेक्षा 1.06 पट
फिरणे : 19.5 दिवसात प्रदक्षिणा
अंतर : ताऱ्यापासून 0.14 एयू
जीवनाची शक्यता : अत्यंत पृथ्वीसारखी, लाल ताऱ्यानजीक, समुद्र असू शकतो.
अन्य उमेदवार : केपलर-362सी, केपलर-220-ई, केपलर-344सी
केपलर-362सी : 2014 मध्ये शोध, पृथ्वीपेक्षा 1.45 पट व्यास, 38 दिवसांत प्रदक्षिणा, सुपर-अर्थ, मानवी वास्तव्ययोग्य असू शकतो
केपलर-220ई : 2014 साली शोध, 46 दिवसांत प्रदक्षिणा, 558 प्रकाश वर्षे दूर, छोटा ग्रह, परंतु तपशील कमी
केपलर-344सी : 2014 साली शोध, नेपच्यून सारखा (3 पट व्यास, 9 पट वजनी), 126 दिवसांत प्रदक्षिणा, 0.49 एयू, मोठा, परंतु सूचीत
भविष्याचा शोध
जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप 2021 पासून काम करत असून हा ग्रहांच्या वायुमंडळांना स्कॅन करतो, जर पाणी, ऑक्सिजन किंवा जैविक वायू मिळाल्यास जीवसृष्टीचा पुरावा ठरेल. आगामी मिशन म्हणजेच एरियल (ईएसए) देखील मदत करणार आहे.